
NCP
February 11, 2025 at 02:35 PM
उन्हाळ्याच्या तोंडावर महायुती सरकारची जलसंजीवनी मोहीम सुरू!
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये जनाई-शिरसाई प्रकल्पाचा समावेश असून, ज्यामुळे दौंड, बारामती, पुरंदर आणि अन्य आसपासच्या हजारो हेक्टर अवर्षणग्रस्त क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. वसई-विरार महानगरपालिका क्षेत्राला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा सुरळीत आणि मुबलक पाणी पुरवठा व्हावा, यासाठी देहरजी पाटबंधारे प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली.
या निर्णयाद्वारे उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याचा अथवा शेतीयुक्त पाण्याचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी महायुती सरकार निरंतर प्रयत्नशील आहे.
👍
🙏
❤️
11