
NCP
February 11, 2025 at 05:12 PM
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे आयोजित 'अजितपर्व विद्यार्थी संवाद अभियान' अनेक विद्यार्थी, शिक्षक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी वसंतराव काळे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या काही समस्या व मागण्या सर्वांसमोर मांडल्या. त्या समस्यांवर त्वरित कार्यवाही करत, संस्थेचे सर्वेसर्वा मा. श्री. कल्याणरावजी काळे यांनी त्वरित संबंधित सूचनांची दखल घेतली.
याप्रसंगी पक्षाचे विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष श्री. प्रशांत कदम पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या आणि उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी ग्रामीण भागातील एका विद्यार्थिनीने स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी चांगली पुस्तकं उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यावर श्री. प्रशांत कदम पाटील यांनी त्या विद्यार्थिनीचे कौतुक करत, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने त्वरित ११,००० रुपयांचा धनादेश संस्थेकडे सुपूर्द केला.
या संवाद अभियानात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतीय सदस्य मा. श्री. कल्याणरावजी काळे, महिला जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा शिंदे, वसंतराव काळे साखर कारखान्याचे संचालक श्री. राजाभाऊ माने, श्री. परमेश्वर लामकाने, प्रदेश सरचिटणीस श्री. महेश बोचरे, प्रदेश सचिव श्री. सुदर्शन कादे, सोलापूर शहराध्यक्ष श्री. पवन पाटील तसेच संस्थेतील शिक्षक, विद्यार्थी आणि स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
👍
6