NCP
                                
                                    
                                        
                                    
                                
                            
                            
                    
                                
                                
                                February 12, 2025 at 01:28 PM
                               
                            
                        
                            राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात 'जनता संवाद' कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन तसेच विशेष सहाय्य मंत्री मा. श्री. नरहरी झिरवाळ यांनी सर्वसामान्य नागरिक, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या विविध मागण्या, अडचणी आणि प्रश्न मंत्री महोदयांसमोर मांडले. त्या सर्व माहितीची काळजीपूर्वक दखल घेत मा. श्री. झिरवाळ साहेबांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ लक्ष देऊन त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी योग्य ते पाऊल उचलण्याच्या सूचना दिल्या.
                        
                    
                    
                    
                    
                    
                                    
                                        
                                            👍
                                        
                                    
                                    
                                        5