NCP

NCP

11.9K subscribers

Verified Channel
NCP
NCP
February 15, 2025 at 11:09 AM
आज परतुर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा भव्य पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी काँग्रेसचे परतुर-मंठा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री. सुरेशकुमार जेथलिया आणि युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष श्री. लक्ष्मण शिंदे यांनी हजारो कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. अजितदादा पवार तसेच प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. आजच्या या पक्षप्रवेशामुळे परतुर-मंठा मतदारसंघासह मराठवाड्यात राष्ट्रवादीच्या पक्ष संघटनाला नक्कीच आणखी बळकटी मिळेल आणि घरोघरी राष्ट्रवादी विचार जास्त ताकदीनं पोहोचतील. या पक्ष प्रवेश सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस श्री. रविंद्र तौर, आ. श्री. राजेश विटेकर, आ. श्री. प्रतापराव पाटील चिखलीकर, आ. श्री. मनोज कायंदे, जालना-संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाचे आ. श्री. सतीश चव्हाण, आ. श्री. विक्रम काळे, श्री. मधुकरराव आर्दड, पक्षाचे जालना जिल्हाध्यक्ष श्री. अरविंदराव चव्हाण, जालना जिल्हा सरचिटणीस श्री. बळीराम कडपे आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व सेलचे प्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती.
👍 ❤️ 6

Comments