NCP

NCP

11.9K subscribers

Verified Channel
NCP
NCP
February 17, 2025 at 09:33 AM
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलतर्फे गडचिरोली येथे ‘अजितपर्व पदाधिकारी संपर्क अभियान’ अंतर्गत ओबीसी पदाधिकाऱ्यांची जिल्हास्तरीय महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष श्री. कल्याणराव आखाडे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. अजितदादा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ओबीसी समाजाच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांची व पक्षाच्या भूमिकेची माहिती दिली. ओबीसी समाजाच्या कल्याणकारी उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि ओबीसी सेलच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय वाढवून पक्षसंघटन अधिक बळकट करण्यावर भर देण्यासाठी मार्गदर्शन केले. या बैठकीस पक्षाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष श्री. रवींद्र वासेकर, प्रदेश सचिव श्री. युनूसभाई शेख, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. राजू गुल्हाणे, प्रदेश सरचिटणीस श्री. प्रभाकर दोनोडे, प्रा. विठ्ठल निखुले, गडचिरोली जिल्हाध्यक्ष श्री. संजय सिंगाडे, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष श्री. संदीप बेलखेडे, विद्यार्थी सेलचे जिल्हाध्यक्ष श्री. चेतन पेंदाम, महिला कार्याध्यक्षा सौ. वृषाली भोयर यांच्यासह ओबीसी सेलचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
❤️ 👍 4

Comments