NCP
February 19, 2025 at 12:31 PM
शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने शिवनेरी किल्ल्यावर आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमावेळी मा. अजितदादांनी शिवभक्तांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी ‘महाराष्ट्रातील गडकिल्ले हीच खऱ्या अर्थाने स्वराज्याची दौलत’ असल्याचे सांगत, त्यांचे जतन व संवर्धन करणे ही आपली सर्वांचीच जबाबदारी असल्याचा उल्लेख केला. तसेच गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकार सदैव प्रयत्नशील असून त्यासाठी कधीही आवश्यक निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असा ठाम विश्वास व्यक्त केला.
👍
❤️
8