
MLA Vinod Agrawal ✅
February 28, 2025 at 09:10 AM
भारतीय जनता युवा मोर्चाच्या विशेष बैठकीचे आयोजन राईस मिलर्स असोसिएशन हॉल मधे करण्यात आले होते. या बैठकीला उपस्थित राहून युवा मोर्चा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष ऍड. येशूलालजी उपराडे आणि महामंत्री सुनीलजी केलनका प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीत सदस्य नोंदणीवर जास्तीत जास्त भर देण्यात यावा अशी सूचना केली तसेच शासनाच्या विविध योजना घरोघरी पोहोचल्या पाहिजेत आणि जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळावा यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे मत व्यक्त केले.
दरम्यान भाजयुमो जिल्हाध्यक्ष ओम कटरे, महामंत्री हर्ष मोदी, जिल्हा उपाध्यक्ष आशिष बारेवार, फनीद्र पटले, जिल्हा सचिव मनोज बोपचे तसेच तालुका व शहर अध्यक्ष, महामंत्री, उपाध्यक्ष, सचिव आणि भाजयुमोचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-
आमदार विनोद अग्रवाल
#bjp #india #narendramodi #modi #amitshah #politics #yogiadityanath #bjpindia #namo #bjym #maharashtra #mla #mlc #gondiya #bhandara #sadak #morgaon #arjuni #lakhni #sakoli #deori #amgaon #abvp #bjym