
Sanjay Puram ✅
February 20, 2025 at 08:44 AM
दि. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी देवरी येथील सी. एस. इंस्टीट्यूटमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमात समर्पित मुलींनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन म्हणून एक सुंदर सांस्कृतिक नृत्य सादर केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांच्या रूपात मा.श्री. राजकुमारजी बडोले माजी मंत्री व आमदार अर्जुनी मोरगाव विधानसभा , मा.श्री. लायकरामजी भेंडारकर अध्यक्ष जि.प.गोंदिया ,मा. श्री. अनिलकुमार बिसेन (सभापती, पं. स. देवरी), मा. श्री. प्रविनकुमार दहीकर(अध्यक्ष, भा.ज.पा. ता. देवरी), मा. श्री. प्रशांतजी ठाकरे ( युवा प्रभोधनकार गोल्ड मेडलिस्ट पुणे विद्यापीठ) , मा.श्री. अविनाश कशिवार ( सभापती, कृ.उ.बा.स. सडक/अर्जुनी ) , मा.श्री. झामसिंगजी येरणे ( अध्यक्ष, कृ. स. तंत्र, शिक्षण संस्था देवरी) , सौ. सविताताई तुरकर (सामाजिक कार्यकर्ता गोंदिया) , मा.श्री. राजकुमारी रहांगडाले (सामाजिक कार्यकर्ता) , कु. सुनंदाताई भुरे ( उपाध्यक्ष ,अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन व महिला संघटन) तसेच इतर मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रथम आपल्या देशासाठी आणि त्यानंतर आपल्या राज्यासाठी लढा दिला. त्यांचे ब्रीद होते –
“मरण आले तरी चालेल, पण शत्रूला शरण जाणार नाही, माघारी फिरायचे नाही.”
या प्रेरणादायी प्रसंगी, शिवरायांच्या महान कार्याबद्दल मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या आदर्शमय जीवनावर प्रकाश टाकला.
मा. श्री. संजय पुराम
आमदार, ६६- आमगाव-देवरी विधानसभा, महाराष्ट्र