Sanjay Puram ✅ WhatsApp Channel

Sanjay Puram ✅

266 subscribers

About Sanjay Puram ✅

आमदार आमगाव-देवरी विधानसभा

Similar Channels

Swipe to see more

Posts

Sanjay Puram ✅
Sanjay Puram ✅
6/13/2025, 5:45:07 PM
Image
Sanjay Puram ✅
Sanjay Puram ✅
6/13/2025, 5:45:07 PM
Image
Sanjay Puram ✅
Sanjay Puram ✅
6/13/2025, 5:32:46 PM

दि. १३-०६-२०२५ रोजी तुंबडीकसा येथील रहवासी श्री. विनोदजी लथखोर अरकरा यांच्या घरावरून विद्युत वाहिनीची तार अचानक कोसळल्यामुळे त्यांच्या घराला आग लागून मोठे नुकसान झाले. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच मी आणि माझा सोबतीस मा. श्री. संजयजी ऊईके (भाजपा तालुका अध्यक्ष, देवरी) व इतर कार्यकर्ते तात्काळ घटनास्थळी भेट दिली व अरकरा कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी झालो. या कठीण प्रसंगी शासनाच्या वतीने आणि माझ्या वैयक्तिक निधीतून रुपये १५,०००/- इतकी तातडीची आर्थिक मदत त्यांना दिली. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी संबंधित विभागाशी चर्चा करून आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. संकटाच्या प्रसंगी नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणं हीच माझी जबाबदारी आहे, आणि ती मी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडत राहीन.🙏🏻 आमदार मा. श्री. संजय पुराम आमगाव-देवरी विधानसभा, महाराष्ट्र

Image
Sanjay Puram ✅
Sanjay Puram ✅
6/5/2025, 5:45:41 AM
Post image
Image
Sanjay Puram ✅
Sanjay Puram ✅
6/6/2025, 5:41:17 AM

सह्याद्रीच्या छाताडातून, नाद भवानी नाजे, काळजात राहती अमुच्या, रक्तात वाहती राजे !! तुफान गर्जतो, आग ओकतो, वाघ मराठी माझा! सन्मान राखतो, जान झोकतो तुफानं मातीचा राजा ! शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आपणास व आपल्या परिवारास शिवमय शुभेच्छा..! आजही त्यांच्या विचारांचा आदर्श प्रशासन, सुरक्षा, आणि जनतेच्या हितासाठी दिशा देणारा ठरतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हीच आपल्या कार्याची प्रेरणा..! जय शिवराय..! जय जिजाऊ..! 🚩🚩 आमदार मा.श्री. संजय पुराम आमगाव-देवरी विधानसभा, महाराष्ट्र

Post image
Image
Sanjay Puram ✅
Sanjay Puram ✅
6/6/2025, 7:04:18 AM

*अनुसूचित जमातीसाठी स्वतंत्र आयोग* महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मंगळवार ३ जून २०२५ रोजी अनुसूचित जमातींसाठी केंद्रीय संस्थेच्या धर्तीवर स्वतंत्र आयोग स्थापन करण्यास मान्यता दिली. यामुळे जिल्ह्यातील आदिवासी नेते व आमगाव मतदार संघ क्षेत्राचे आमदार संजयदादा पुराम यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले.

Post image
Image
Sanjay Puram ✅
Sanjay Puram ✅
6/6/2025, 10:31:34 PM
Post image
Image
Sanjay Puram ✅
Sanjay Puram ✅
6/5/2025, 5:41:39 AM

उत्तर प्रदेशाचे यशस्वी, कर्तबगार व लोकहितैषी मुख्यमंत्री मा. श्री. योगी आदित्यनाथजी ( @myogi_adityanath ) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! आपले राष्ट्रवादी नेतृत्व, कठोर प्रशासकीय निर्णयक्षमता आणि जनसेवेप्रती असलेली निष्ठा ही संपूर्ण देशासाठी प्रेरणादायक आहे. आपल्या कार्यातून नवभारत साकार करण्याचे स्वप्न साकार होत आहे. आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि राष्ट्रसेवेची अधिकाधिक संधी लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना..! आमदार मा.श्री. संजय पुराम आमगाव-देवरी विधानसभा, महाराष्ट्र

Post image
Image
Sanjay Puram ✅
Sanjay Puram ✅
6/4/2025, 6:36:08 AM

🔥 १८ वर्षांची प्रतीक्षा संपली – अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विजयी झाली! 🔥 आजचा दिवस केवळ क्रिकेटचा नाही, हा दिवस आहे जिद्दीचा, संयमाचा आणि अस्सल निष्ठेचा विजय! 🎉❤️अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाचे मनःपूर्वक अभिनंदन! तुमच्या मेहनतीने, संघभावनेने आणि अविरत प्रयत्नांनी अखेर तुमचं स्वप्न साकार केलं — IPL 2025 चे खिताब विजेतेपद! 🏆 आमदार मा.श्री. संजय पुराम आमगाव-देवरी विधानसभा, महाराष्ट्र

Post image
Image
Sanjay Puram ✅
Sanjay Puram ✅
6/9/2025, 2:39:01 AM

जननायक भगवान बिरसा मुंडा यांना विनम्र अभिवादन🙏 आदिवासी समाजाचे दीपस्तंभ, संघर्षाचे प्रतीक, आणि आमचे मार्गदर्शक गुरू भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन. त्यांचे विचार आणि कार्य आजही लाखो तरुणांच्या हृदयात क्रांतीची ज्वाला पेटवतात. त्यांनी दाखवलेला आत्मसन्मानाचा मार्ग हा आजच्या काळातही आपल्या कार्याचा आदर्श आहे. आज त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी, चला आपण सर्वजण त्यांच्या शिकवणीने प्रेरित होऊन नवभारताच्या निर्मितीत योगदान देण्याचा संकल्प करूया. भगवान बिरसा मुंडा, आमचे प्रेरणास्थान, आमचे गुरु🙏🏻 आमदार मा.श्री. संजय पुराम आमगाव-देवरी विधानसभा, महाराष्ट्र

Post image
Image
Link copied to clipboard!