Think Maharashtra थिंक महाराष्ट्र
Think Maharashtra थिंक महाराष्ट्र
February 27, 2025 at 01:03 PM
अलिबाग हे पुण्यामुंबईजवळचे समुद्र किनाऱ्यावरील गाव. अलीकडच्या काळात ‘टुरिस्ट प्लेस’ म्हणून गाजलेले. ते दोन दिवसांच्या ट्रिपसाठी उत्तम मानले जाते. मुंबईहून तेथे ‘रोरो बोट सर्व्हिस’ने जाता येत असल्याने अलिबागचे पर्यटन केंद्र म्हणून महत्त्व अधिकच वाढले आहे. पण अलिबागला मोठा इतिहास आहे. शिवाजीराजे व आंग्रे सरदार यांच्या कथाकहाण्या प्रसिद्ध आहेतच, पण ज्यू लोक दोन हजार वर्षांपूर्वीपासून येथे राहत आले आहेत. त्यांची जुनी घराणी आहेत आणि आता संबंध इस्त्रायलशी जोडलेले आहेत. बरेच लोक तिकडे स्थलांतरित झाले आहेत. अलिबागचा पांढरा कांदा हे तेथील वैशिष्ट्यपूर्ण पीक आहे. अलिबागला ब्रिटिशकाळात हवामान केंद्र होते. ते तत्कालीन कुलाबा (आता रायगड) जिल्ह्याचे मुख्य शहर होय. तेथून जिल्ह्याचे सर्व व्यवहार होतात... संपूर्ण लेख - https://thinkmaharashtra.com/अलिबाग-माझे-गाव/

Comments