
Think Maharashtra थिंक महाराष्ट्र
February 28, 2025 at 06:00 AM
माझे वास्तव्य 1966 सालानंतर अलिबागला झाले. तेथील चंगळ म्हणजे डेव्हीडचा गोटीचा सोडा, आईस्क्रीम सोडा अथवा आईस्क्रीम घेणे ही होती. बेने इस्त्राईल समाजाची काही कुटुंबे अलिबाग परिसरात राहिली होती. डेव्हीड कुटुंब हे त्या बेने इस्त्राईल समाजाचे. ते तिघे भाऊ होते आणि त्यांचे कुटुंब एकत्र राहत. त्यांचा पिठाच्या गिरणीचा व्यवसाय होता. तेथील मोकळ्या जागेत त्यांनी ‘सोडा वॉटर’ फॅक्टरी टाकली होती. गोटीच्या सोड्याचा इतिहास बहुधा ब्रिटिश काळाला भिडणारा असावा. ड्यूक्सच्या सोड्याने त्याचे बस्तान महाराष्ट्रात बसवण्यापूर्वी खेडोपाडी गोटीचा सोडा प्रसिद्ध होता. त्याचे एक दुकान पोयनाडजवळच्या पळी गावाच्या फाट्यावर आहे. त्या सोड्याची लज्जत ज्यांनी पूर्वी अनुभवली आहे, ती मंडळी तेथे गाडी हमखास थांबवून त्याचा आस्वाद घेताना दिसतात...
संपूर्ण लेख - https://thinkmaharashtra.com/अलिबागचा-गोटीचा-सोडा/