
Dattatray Bharane Official
February 5, 2025 at 11:37 AM
अल्पसंख्याक विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत मंत्रालयात आज आढावा बैठक घेण्यात आली. राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ या घटकातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा, यासाठी काटेकोर नियोजन करा, असे निर्देश यावेळी दिले.
या बैठकीला विभागाचे सचिव रुचेश जयवंशी, राज्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी (दूरदृश्य प्रणालीद्वारे) उपसचिव मिलिंद शेणॉय, श्रीमती विशाखा आढाव उपस्थित होते.