
Rajkumar Badole ✅
February 22, 2025 at 04:28 AM
तिबेट कॅम्पमध्ये आयोजित बौद्ध धर्मीय कार्यक्रमाला तिबेटी तुळकू आणि महान अध्यात्मिक गुरू कायब्जे योंगझिन लिंग रिनपोचे यांचे मार्गदर्शन लाभले. निमित्ताने त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची आणि त्यांचे आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली. रिनपोचे यांनी केवळ १२ वर्षे ड्रेपुंग लोसेलिंग मोनास्टिक युनिव्हर्सिटीमध्ये कठोर अभ्यास करून २१ व्या वर्षी गेशे ल्हारामपा ही प्रतिष्ठित पदवी संपादन केली. त्यानंतर ग्युटो तांत्रिक मठाचे शिस्तपाल आणि मठाधिपती म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. त्यांच्या प्रेरणादायी उपस्थितीने आणि मार्गदर्शनाने कार्यक्रमाने अधिक आध्यात्मिक उंची गाठली.
जॉइन 👇🏻
https://x.com/rajkumarsbadole
-
राजकुमार बडोले
माजी मंत्री सा. न्याय व विशेष सहाय्य
आमदार, अर्जुनी मोरगाव विधानसभा