
Rajkumar Badole ✅
February 25, 2025 at 08:35 AM
सडक अर्जुनी येथील पंचायत समिती सभागृहात पाणी टंचाई उपायोजना आढावा बैठक संपन्न झाली. या सभेत पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची माहिती घेतली गेली व ग्रामपंचायतकडून प्राप्त ठरावानुसार पाणी टंचाई कृती आराखडा टप्पा-३ मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला . जल जीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या तसेच काही कारणास्तव बंद असलेल्या कामांवर सखोल चर्चा करून समस्या निराकरणासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.
बैठकीत पंचायत समिती सभापती श्री. चेतनजी वळगाये, उपसभापती सौ. निशाताई काशीवार, सदस्य सर्वश्री संगीताताई खोब्रागडे, शालींदरजी कापगते, शिवाजी गहाणे, अल्लाउद्दीनजी राजानी, वर्षाताई शहारे, सपनाताई नाईक, गटविकास अधिकारी रविंद्रजी सानप, मृदा व जलसंधारण अधिकारी सत्यजितजी राऊत, मजीप्रा कार्यकारी अभियंता नरेशजी नंदेश्वर, महावितरणचे उपअभियंता श्री. रेवतकर यांच्यासह इतर अधिकारी, संरपच, ग्रामसेवक व नागरिक उपस्थित होते.
जॉइन 👇🏻
https://x.com/rajkumarsbadole
-
राजकुमार बडोले
माजी मंत्री सा. न्याय व विशेष सहाय्य
आमदार, अर्जुनी मोरगाव विधानसभा