Rajkumar Badole ✅
Rajkumar Badole ✅
February 26, 2025 at 03:20 PM
आज महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर प्रतापगड येथे मोफत महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये परिसरातील नागरिकांना आणि यात्रेकरिता आलेल्या भाविकांची तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व उपचार करण्यात आले. यावेळी विविध आरोग्य विभागांचे माहितीपर स्टॉल्स देखील लावण्यात आले होते. रुग्णांसाठी विशेष सुविधा आणि औषधोपचाराची सोय देखील करण्यात आली होती. यावेळी शिबिराचा अध्यक्ष म्हणून उपस्थित होतो. सोबतच जिल्हा परिषद अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर उपस्थित होते. याप्रसंगी सडक अर्जुनी पंचायत समितीचे सभापती चेतनजी वळगाये, जिल्हा परिषद सदस्य कविताताई रंगारी, माजी उपसभापती होमराजजी पुस्तोडे, पंचायत समिती सदस्य नूतनलालजी सोनवणे, राजहंसजी ढोके, प्रतापगडचे सरपंच भोजराजजी लोगडे, केशोरचे सरपंच नंदकुमारजी गहाणे तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीशजी मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीनजी वानखेडे आणि तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित होती. आपण सर्वांना महाशिवरात्री निमित्त हार्दिक शुभेच्छा!! जॉइन 👇🏻 https://x.com/rajkumarsbadole - राजकुमार बडोले माजी मंत्री सा. न्याय व विशेष सहाय्य आमदार, अर्जुनी मोरगाव विधानसभा #shivratri #mahashivratri #mahadev #shiva #shiv #bholenath #harharmahadev #mahakal #lordshiva #omnamahshivaya #shivshakti #india #god #shivay #shivshankar #shambhu #shivji #bholebaba #mahakaal #mahakaleshwar #kedarnath #ujjain #shivika #krishna #bhakti #lord #shivbhakt #hanuman #love #bhole
💐 1

Comments