
Adv. Prakash Ambedkar Official
March 1, 2025 at 09:46 AM
स्वारगेट अत्याचाराच्या घटनेच्या निमित्ताने
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून काही महत्त्वाचे प्रश्न...
1. बसस्थानकात रात्री पार्क केलेल्या बसमध्ये सर्व व्यवहार- व्यवसाय चालतात. देह विक्री, ड्रग्स विक्रीसारखे प्रकार तिथे चालतात हे सर्वांना माहीत आहे, असणार. एसटी प्रशासन आणि पोलीस यापैकी कोणीही याबद्दल गंभीर आहे असे दिसत नाही. किंबहुना त्यांनी काही कारवाई केली आहे किंवा कधीही चिंता व्यक्त केलेली दिसत नाही.
2. एसटी प्रशासनाने कंत्राटी कर्मचारी नेमले असले तरी ते रेल्वे पोलीसप्रमाणे ती स्वतंत्र कायदा सुव्यवस्था नाही. त्यामुळे 23 कंत्राटी सुरक्षारक्षक निलंबित केले असले तरी पुणे पोलिस त्यांची जबाबदारी झटकू शकत नाहीत.
3. कंत्राटी स्टाफ, कंत्राटदार - यांना या अत्याचार प्रकरणातील सुरक्षाविषयक अपयशाला जबाबदार किंवा उत्तरदायी धरले जाऊ शकते का?
4. कंत्राटी कामगारांवर बसस्थानकातील सुरक्षिततेची जबाबदारी कशी असू शकते? त्यात बेरोजगारांची भरती असणार आहे. त्यांची नोकरीची अगतिकता असल्यामुळे त्यांना कुणाच्यातरी मर्जीप्रमाणेच काम करावे लागत असणार. हे व्यवहार करणाऱ्यांची सरकार दरबारी असणारी मिलीभगत, हप्ते बांधलेले असणे, गुंडाचे संरक्षण हे बघता ते कशाला आपली नोकरी आणि जीव धोक्यात घालतील?
5. तिथे नेहमी वावर असणाऱ्यांना ही सर्व परिस्थिती माहित आहे. तरीही नागरिक म्हणून ते कोणाला तरी सांगावे असे का वाटले नाही.
: प्रा. अंजलीताई आंबेडकर
राष्ट्रीय नेत्या, वंचित बहुजन आघाडी
👍
❤️
🙏
✊
11