
Vishal Pawar
February 15, 2025 at 02:55 AM
Jio-Hotstar
भारतातील करमणूक क्षेत्रात एक महाकाय कंपनीचा उदय !
रिलायन्स समूहाचा जिओ सिनेमा आणि डिस्ने+हॉटस्टार हे कालपर्यंत वेगवेगळे ओटीटी प्लॅटफॉर्म होते. कालपासून दोघांचे विलीनीकरण होऊन एकच जिओ हॉटस्टार हा ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू झाला.
दोघांचे मिळून पाच कोटी नियमित वर्गणीदार आहेत आणि पन्नास कोटी दर्शक.
हीच तारीख का ? तर पुढच्या काही दिवसात इंडियन प्रीमियर लीग सुरू होत आहे. त्याचे प्रक्षेपण याच ओटीटी प्लॅटफॉर्म वरून होणार आहे.
ही सुटी घटना म्हणून बघता कामा नये. तर भारतीय करमणूक क्षेत्रात आधीच सुरू झालेल्या मुक्तेदारीकरण प्रक्रियेतील एक कडी म्हणून बघावे लागेल.
__________________
मक्तेदारीकरणाचा ताबडतोबीचा परिणाम ग्राहकांना द्यावे लागणाऱ्या वस्तुमान सेवांच्या किमती वाढण्यात होत असतो.
उदा. गेली काही वर्षे दर्शकांना आयपीएलच्या मॅचेस जिओ सिनेमा वर फुकट बघायला मिळत होत्या. यावर्षी त्यांना त्यासाठी पैसे मोजावे लागतील.
या महाकाय ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रदर्शित केल्या जाणाऱ्या जाहिरातींचे दर देखील वाढणार आहेत.
जाहिरातदार स्वतःच्या खिशातून जाहिरात खर्च करत नाहीत. जाहिरातींवर होणारा खर्च वस्तुमाल सेवांच्या एकूण उत्पादन खर्चात पकडला जातो. आणि त्याप्रमाणे वस्तुमाल / सेवांच्या किमती देखील वाढतात.
_________________
एखाद्या क्षेत्रात अजस्त्र कंपनी तयार झाली तर छोट्या कंपन्यांचा निभाव लागणे कठीण होत जाते. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांना देखील परस्परात विलीन होऊन मोठ्या कंपन्या तयार कराव्या लागतात. नाहीतर दुकानच बंद करावे लागते
मक्तेदारीकरणाचे परिणाम फक्त अर्थव्यवस्थेवर नाही तर त्या देशातील सत्तेच्या राजकारणावर देखील होत असतात.
संजीव चांदोरकर (१५ फेब्रुवारी २०२५)
https://www.facebook.com/share/p/19vF73wP5m/