Vishal Pawar
March 1, 2025 at 02:41 AM
दलाल स्ट्रीट वर रक्तपात ! जे घडत आहे ते गंभीर सिद्ध होऊ शकते…
काल एकाच दिवसात सेन्सेक्स १४०० पेक्षा जास्त अंकांनी घसरला. म्हणजे गेले पाच महिने घसरतच होता. काल अजून जोरदार आपटला.
ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी असे पाच महिने सलग सेन्सेक्स घसरत आहे. सतत पाच महिने घसरण याआधी २९ वर्षांपूर्वी झाली होती. यावरून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येईल.
सप्टेंबर मध्ये ८५, ९७८ असा ऐतिहासिक उंचीवर असलेला सेन्सेक्स १४ टक्क्यांनी घसरून काल ७३,१९२ वर बंद झाला. लक्षात घ्या सेन्सेक्स सर्वात मोठ्या ३० कंपन्यांच्या शेयर्सवर बेतलेला असतो.
_____________
कारणे म्हटली तर माहित असलेलीच आहेत. परकीय गुंतवणूकदार शेअर्सची जोरदार विक्री करत आहेत, भारतीय कंपन्या अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत नाहीयेत, डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर त्यांनी जागतिक व्यापाराची, जागतिक अर्थव्यवस्थेची आपल्याला गेली ४० वर्षे माहीत असलेली घडी पार विस्कटवून टाकली आहे.
शेअर मार्केट मधील सट्टेबाज, शॉर्ट टर्म गुंतवणूकदार सर्वात कशाला घाबरत असतील ? ते अनिश्चिततेला जास्त घाबरतात. भविष्य धूसर किंवा अंधकारमय वाटल्यावर सर्वात सुरक्षित उपाय म्हणजे शेअर्स विकून कॅशवर बसणे. हेच बरेच जण करू लागले आहेत.
पण शेअर्स कोसळण्याचे सर्वात महत्वाचे कारण असते त्याचे फुगलेले खरेतर फुगवलेले अवाजवी भाव. सांगितले जात होते भारतीय शेयर मार्केटचे स्नायू बळकट होत आहेत , त्यातील अर्धी तर सूज असू शकते
शेअर्सच्या किमतींचा काही एक जैविक संबंध कंपन्यांच्या विक्री आणि नफ्याशी असला पाहिजे. ती नाळ तुटून शेअर्सचे भाव अवाजवी पातळीवर गेले की तो फुगा फुटतोच फुटतो. आज नाही तर उद्या.
_______________________________
हे सर्वात जास्त झाले आहे मध्यम आकाराच्या आणि छोट्या आकाराच्या कंपन्यांमध्ये. त्यांना मिड कॅप आणि स्मॉल कॅप म्हणतात. मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक अनुक्रमे २१ आणि २६ टक्क्यानी घसरले आहेत. म्हणजे सरासरी पेक्षा खूप जास्त.
अनेक मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकातील कंपन्यानी गेल्या एक-दोन वर्षात अव्वाच्या सव्वा प्रीमियम आकारून आयपीओ काढले होते. तो सारा फुगा फुटू लागला आहे.
या मध्यम आणि छोट्या आकाराच्या कंपन्यांचे बिझनेस मॉडेल, त्या कंपन्यांमधील कॉर्पोरेट गव्हर्नन्सची गुणवत्ता, आकडेवारी बद्दल अपारदर्शीपणा आणि साशंकता आणि मर्चंट बँकर्सना हाताशी धरून शेअरचे चढवलेले मूल्यांकन.,... काय चालले आहे सर्वांना माहिती होते.
याला वेसण घालण्याची घटनादत्त जबाबदारी ज्या सेबी वर होती ती मात्र सर्व काही मार्केट फॉर्सेस वर सोडून तोंडात तंबाखूची गुळणी करून बसली होती.
सट्टेबाजानी आपापसात मारामाऱ्या करून एकमेकांचे रक्त काढले तर काही फरक पडत नाही. पण गेल्या काही वर्षात मध्यम आणि निम्न मध्यमवर्ग यांच्या हजारो कोटी रुपयांच्या बचती मोठ्या प्रमाणावर म्युच्युअल फंडा मार्फत शेअर मार्केटमध्ये गुंतवले जात आहेत. त्यातील अनेक मिडकॅप आणि स्मॉल कॅप मध्ये आहेत.
पुढच्या एक दोन महिन्यात म्युच्युअल फंडांचे एन ए व्ही…. नेट ऍसेट व्हॅल्यू…. यायला लागतील त्यावेळेस चित्र अधिक स्पष्ट होईल.
___________________
शेयर मार्केट खाली जाते , मग काही काळाने वर जाते अशी शाळकरी मांडणी करणाऱ्या लोकांना ; जपान मधील शेयर निर्देशांक अवाजवी भावांमुळे वाढला , मग आपटला आणि नंतर ३० वर्षे उठू शकला नव्हता
संजीव चांदोरकर (१ मार्च २०२५)
https://www.facebook.com/share/18asDPkooi/