MahaNaukri24
MahaNaukri24
February 7, 2025 at 02:02 AM
🔰 *भूगोलातील अतिशय महत्त्वाचे प्रश्न* ▪️ *माळढोक पक्षी अभयारण्य कोणत्या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे?* अहमदनगर-सोलापूर ▪️ *प्रसिद्ध 'मालगुजारी तलाव' महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळतात?* - भंडारा-गोंदिया ▪️ *महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता?* – सिंधुदुर्ग ▪️ *भारतातील सर्वात कमी लोकसंख्या घनतेचे राज्य कोणते आहे?* अरुणाचल प्रदेश ▪️ *महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे?* - इचलकरंजी ▪️ *तांबडा समुद्र व भूमध्य सागर कोणत्या कालव्याने जोडले गेले आहेत?* - सुवेझ ▪️ *महाबळेश्वरच्या डोंगराची उंची किती मीटर आहे?* -1438 मीटर ▪️ *वर्धा व पैनगंगा या दोन नद्यांचा संगम कोठे होतो?* - चंद्रपूर ■ *गडचिरोली जिल्ह्याचे एकूण किती क्षेत्र वनाखाली आहे?* -75 टक्के ▪️ *" महादेव डोंगराच्या दक्षिणेकडून वाहणाऱ्या नदीचे नाव काय आहे?* -कृष्णा ■ *राज्यातील उत्पादनक्षम खनिजसाठे असणारे क्षेत्र राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रांच्या किती टक्के आहे?* - 19% ■ *जगातील सर्वाधिक विस्तृत पठार जे मध्य आशियात आहे, ते कोणते?* -तिबेटचे पठार

Comments