Rahul Narwekar
Rahul Narwekar
February 6, 2025 at 01:19 PM
दैनिक लोकसत्ता या वर्तमानपत्राच्या ७७व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला काल राज्याचे विधानसभा अध्यक्ष मा. अ‍ॅड. राहुल नार्वेकर जी यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी लोकसत्ताचे संपादक मा. श्री. गिरीश कुबेर जी यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात 'लोकसत्ता वर्षवेध- २०२४' या वर्षभराचा दस्तावेज माहितीरूपात पुरविणाऱ्या आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसह माहितीसंग्रहकांना उपयुक्त असणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी व अन्य मान्यवरांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र मंत्री मंडळातील मंत्री मा. श्री. गिरीश महाजन जी, मा. गणेश नाईक जी, मा. श्रीमती. पंकजाताई मुंडे जी, मा. श्री. उदय सामंत जी, मा. श्रीमती अदिती तटकरे जी, मा. श्री. माणिकराव कोकाटे जी, मा. श्री. प्रताप सरनाईक जी, मा. श्री. आकाश फुंडकर जी, ज्येष्ठ नेते मा. आमदार छगन भुजबळ जी, राज्याच्या मुख्य सचिव मा. श्रीमती. सुजाता सौनिक जी, मुंबई पोलीस आयुक्त मा. श्री. विवेक फणसाळकर जी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Comments