Rahul Narwekar
February 12, 2025 at 07:40 AM
नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे,अत्यंत ते साजिरे | माथा शेंदूर झरे वरी बरे,दुर्वांकुरांचे तुरे ||
माझे चित्त विरे मनोरथ पुरे,देखोनि चिंता हरे | गोसावीसुत वासुदेव कवी रे,त्या मोरयाला स्मरे||
राज्याचे विधानसभा अध्यक्ष मा. अॅड. राहुल नार्वेकर जी यांनी त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने श्री. सिद्धिविनायकाचे व मुंबईचे ग्रामदैवत असलेल्या आई मुंबादेवीचे दर्शन घेतले व प्रार्थना केली. कुलाबा मतदारसंघातील व राज्यातील समस्त नागरिकांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे अशी प्रार्थना त्यांनी गणरायाकडे केली. यावेळी मंदिर समितीने मा. अध्यक्षांचे स्वागत देखील केले.