Rahul Narwekar
Rahul Narwekar
February 27, 2025 at 02:35 PM
मंदार बिल्वे बकुलें सुवासी | माला पवित्र वहा शंकरासी | काशीपुरी भैरव विश्र्व तारी | तुजवीण शंभो मज कोण तारी || महाशिवरात्रीनिमित्त कुलाबा मतदारसंघातील श्री. कामनाथ महादेव मंदिर, दर्यानगर शिवमंदिर, पिंपळेश्वर महादेव मंदिर व न्यू लक्की स्टार मित्र मंडळातर्फे आयोजित महाशिवरात्री उत्सवाला राज्याचे विधानसभा अध्यक्ष मा. अ‍ॅड. राहुल नार्वेकर जी यांनी भेट देत श्री. शंभू महादेवाचे दर्शन घेतले. महाशिवरात्रीचा उत्सव हा समस्त शिव भक्तांसाठी आनंदाची मोठी पर्वणी असते. या महाशिवरात्रीनिमित्त भगवान शिव शंकराचा जागर करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक भक्त मंदिरात आले होते. यावेळी भगवान शिव शंकराने आपल्या सगळ्यांना निरोगी आयुष्य प्रदान करो, अशी प्रार्थना मा. अध्यक्षांनी केली.

Comments