Rahul Narwekar
Rahul Narwekar
February 28, 2025 at 01:29 PM
लोकमत वृत्त समुहातर्फे आयोजित लोकमत Excellence Awards 2025 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात राज्याचे विधानसभा अध्यक्ष मा. अ‍ॅड. राहुल नार्वेकर जी प्रमुख अतिथी म्हणून सहभागी झाले. यावेळी मा. अध्यक्षांच्या हस्ते विविध क्षेत्रात गुणवाण कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच लोकमत समुहाने मा. अध्यक्षांचा देखील विशेष सत्कार केला, याबद्दल मा. अध्यक्षांनी त्यांचे आभार देखील मानले. एक सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मा. अध्यक्षांनी लोकमत समुहाचे विशेष कौतुक व अभिनंदन केले. याप्रसंगी राज्याचे मंत्री मा. श्री. उदय सामंत जी, मंत्री मा. श्री. प्रकाश आबिटकर जी, लोकमत मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी जी व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.

Comments