
सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य
February 27, 2025 at 11:20 PM
https://www.tv9marathi.com/national/indian-student-satara-karad-girl-neelam-shinde-accident-in-america-parents-trying-for-early-visa-1357221.html?fbclid=IwY2xjawIt0l5leHRuA2FlbQIxMQABHbQm1KyfTovdxNlivU7jM5CybX7UTCDoHt5ZlMK5UCc_PbqsGfLDcrSkSg_aem_1plKep9IWW_4aUpHn2BxxA
सध्या निलमची रूममेट खुशी ही महाराष्ट्रातील असून तिच्याकडून उंब्रजमधील पालकांना माहिती मिळत आहे. अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या कराडच्या मुलीचा तिथे भीषण अपघात झाला.साताऱ्याच्या कराड तालुक्यातील लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज सुरू आहे. पण तिच्या पालकांना अमेरिकेचा मेडिकल इमर्जन्सी व्हिसा मिळत नाहीय. सातारा कराड तालुक्यातील उंब्रज गावच्या निलम शिंदे या 35 वर्षीय विद्यार्थीनीचा अमेरिकेत 11 दिवसांपूर्वी अपघात झाला. तिच्यावर अमेरिकेत आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. मरणाच्या दारात असणाऱ्या मुलीला भेटण्यासाठी जाणाऱ्या पालकांना व्हिजा मिळत नाहीय. निलम हीचा 14 फेब्रुवारी 2024 रोजी अमेरिकेत व्यायामासाठी चालताना एका चारचाकी गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिली.या अपघाताला दोषी असलेल्या कार चालकाला पोलिसांनी पकडले आहे. मात्र, रक्ताचे नातेवाईक आल्याशिवाय गुन्हा दाखल होत नसल्याचे अमेरिकेतील पोलिस सांगतायत. अपघातात निलमच्या डोक्याला आणि दोन्ही हाता, पायांना आणि दुखापत झाली आहे. तिच्या छातीलाही मार लागला असल्याने तिची प्रकृती गंभीर आहे.