सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य
सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य
February 28, 2025 at 07:06 AM
वसमत येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने देण्यात येणारा राजा शिवछत्रपती समाज भूषण मरणोत्तर पुरस्कार बीड जिल्ह्यातील मस्जाजोग येथील आदर्श सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांना जाहीर झाला आहे त्यांचे कुटुंबीय प्रत्यक्ष हा पुरस्कार स्विकारणार आहेत. वसमत येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव हा वैचारिक विचारांचाआणि प्रबोधन करणारा असतो यावर्षी राष्ट्रीय किर्तनकार देवाची आळंदी येथील ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांचा किर्तनचा भव्यदिव्य कार्यक्रम आज दि. 28 फेब्रुवारी 2025 वार शुक्रवार सायं 6 वाजता आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा.... स्थळ : जिल्हा परिषद मैदान वसमत
👍 ❤️ 6

Comments