
Rohit RR Patil (Official )
February 21, 2025 at 05:16 PM
ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचे काम पाहणाऱ्या आपल्या माता-भगिनींना आपण आशा सेविका किंवा आशा ताई म्हणून ओळखतो. आज आशा सेविकांचा राष्ट्रीय दिवस-—“आशा डे”—तासगाव शहरातील साने गुरुजी नाट्यगृहात साजरा करण्यात आला. तालुका वैद्यकीय अधिकारी आणि तासगाव तालुका ग्रामीण आरोग्य केंद्र यांच्या मार्फत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भेट देऊन आशा सेविकांसोबत संवाद साधुन शुभेच्छा दिल्या.
#rrpatil #wewillrise
❤️
👍
3