Rohit RR Patil (Official )
Rohit RR Patil (Official )
February 22, 2025 at 02:23 PM
प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण भागातील दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थ्यांच्या आवास योजनेचे मंजुरी पत्र आणि प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते पुणे येथे पार पडला. त्याच धर्तीवर तासगाव तालुक्यातील लाभार्थ्यांच्या प्रथम हप्त्याचे वितरण कार्यक्रम पंचायत समिती तासगाव यांच्यामार्फत तासगाव शहरातील साने गुरुजी नाट्यगृह येथे पार पडला, यामध्ये तालुक्यातील लाभार्थ्यांना या योजने अंतर्गत मंजूर झालेले मंजुरी पत्र आणि प्रथम हप्त्याचे वितरण करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमास गटविकास अधिकारी किशोर माने साहेब, माजी सभापती संजय जमदाडे, संभाजी भाऊ पाटील, बेबीताई माळी, मायाताई एडके,बाळासो एडके नाना, तालुक्यातील पदाधिकारी, नागरिक आणि लाभार्थी उपस्थित होते. #rrpatil #wewillrise
👍 3

Comments