
Rohit RR Patil (Official )
February 26, 2025 at 11:49 AM
कवठेएकंद गावामध्ये असलेली सिद्धराज सहकारी शेती पाणीपुरवठा संस्था नं 1 व 2 या मतदारसंघातील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्वात मोठ्या संस्था आहेत. आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत कवठेएकंद परिसरातील क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पाच्या सर्वे चा शुभारंभ आज कवठेएकंद येथे पार पडला. क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पांमध्ये, जमिनीतील क्षारांचे प्रमाण कमी करण्यासाठी सच्छिद्र निचरा प्रणालीचा वापर केला जाणार असून या प्रकल्पांमुळे कवठेएकंद मधील क्षारपड असलेली 600 हेक्टर जमिनीची सुधारणा होऊन ती जमीन सुपीक होणार आहे. या कार्यक्रमास खासदार विशाल दादा पाटील, संस्थेचे सर्व संचालक,जलसंपदा व कृषी विभागाचे अधिकारी, शेतकरी, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते
#rrpatil #wewillrise
👍
🙏
2