शेतकरी ई प्लॅटफॉर्म
February 8, 2025 at 05:06 PM
राष्ट्रीय एफपीओ धोरण: शासकीय योजना आणि वित्तसाह्य
१२ फेब्रुवारी २०२५ रोजी ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन
केंद्र शासनाने शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) चळवळीला एक नवी दिशा देण्यासाठी राष्ट्रीय एफपीओ धोरणाचा मसुदा तयार केला आहे. या धोरणामुळे एफपीओंना योग्य मार्गदर्शन मिळणार आहे, ज्यामुळे त्यांचे व्यवसाय अधिक सक्षम, मजबूत आणि टिकाऊ होऊ शकतात. नव्या धोरणामुळे एफपीओंना आवश्यक साधनसुविधा, वित्तसाह्य, बाजारजोडणी, अन्न प्रक्रिया, आणि दूध उत्पादनासाठी सरकारी मदतीचे लाभ मिळणार आहेत. याशिवाय, महिलांसाठी सक्षमीकरणाची योजना तसेच तंत्रज्ञानाच्या वापरामुळे एफपीओंना कार्यक्षम बनवण्यात मदत होईल.
सिमासेस लर्निंग (SIILC) आणि सकाळ-एग्रोवन या प्रशिक्षण संस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या ऑनलाइन प्रशिक्षणामध्ये तुम्ही या नव्या धोरणाबद्दल सखोल माहिती मिळवू शकता. या प्रशिक्षणात राष्ट्रीय एफपीओ धोरणाचा मसुदा, केंद्र सरकारचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प, एफपीओंसाठी नव्या योजनांचा समावेश, तसेच वायदे बाजारातील नवीन संधी यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात येईल. या प्रशिक्षणामुळे एफपीओ सदस्यांना विविध संधी आणि मदतीचा लाभ घेता येईल.
संपूर्ण प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करा आणि एफपीओ क्षेत्रातील नवीन संधीचा लाभ घ्या!
महत्त्वाचे तपशील :
🕒 वेळ: स. १०.३० ते सायं ५.३०
📅 प्रशिक्षणाची तारीख: १२ फेब्रुवारी २०२५
संपर्क : 8956712631; 9156010060
तसेच खाली दिलेल्या google लिंक वर जाऊन नावनोंदणी करू शकता . https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfb_pBOlciIgPcPa8okK0o7zpIx3K6uTJ6PqqgUEWkIurR8RQ/viewform?usp=header
शुल्क :५०० रु फक्त
👍
🙏
3