Vivek Kolhe
Vivek Kolhe
May 13, 2025 at 01:16 PM
जगभरात Iron Dome ची प्रशंसा असली तरी, अनेक तज्ज्ञ मानतात की भारताची ‘आकाश डिफेन्स सिस्टिम’ अनेक बाबतीत सरस आहे. या यशामागे उभे आहेत डॉ. प्रल्हाद रामाराव – कर्नाटकातील एका छोट्या गावातून आलेले, पण जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ. BELमध्ये नोकरी मिळूनही आईच्या आग्रहामुळे त्यांनी IISc बंगलोरमध्ये शिक्षण घेतलं. पुढे VSSC, आणि DRDL हैदराबादमध्ये काम करताना त्यांची भेट झाली डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याशी – जे आयुष्यभरासाठी मार्गदर्शक ठरले. १९८३ मध्ये भारताने ५ स्वदेशी क्षेपणास्त्र प्रकल्प मंजूर केले – त्यापैकी सर्वात गुंतागुंतीचा होता ‘आकाश’, ज्याचं नेतृत्व डॉ. प्रल्हाद यांच्याकडे होतं. राजेंद्र रडारसह ‘आकाश’ हे एक हवाई संरक्षण क्षेपणास्त्र बनलं – जे ८ लक्ष्य एकावेळी भेदू शकतं. १९९० मध्ये चाचण्या, २००५ मध्ये यशस्वी अडथळा मोहीम, आणि २०२३ मध्ये एकाच वेळी ४ लक्ष्य निष्प्रभ. प्रगत आवृत्त्या – आकाश 1S, Prime, NG – आज लष्कर, वायुदल आणि नौदलात वापरात आहेत. ब्रह्मोस प्रकल्पातही त्यांचं महत्त्वाचं योगदान. निवृत्तीनंतर Cold Fusion Reactor वर संशोधन सुरू – भविष्यातील ऊर्जा क्रांतीसाठी! २०१५ मध्ये पद्मश्री पुरस्कार, आणि राष्ट्राच्या संरक्षण तंत्रज्ञानातील एक अढळ नाव – डॉ. प्रल्हाद रामाराव!
Image from Vivek Kolhe: जगभरात Iron Dome ची प्रशंसा असली तरी, अनेक तज्ज्ञ मानतात की भारताची ‘आ...
🙏 ❤️ 8

Comments