Vivek Kolhe
Vivek Kolhe
June 5, 2025 at 02:38 PM
भाग्योदय मंगल कार्यालय, डो-हाळे (ता. राहाता) येथे वै. ह. भ. प. भाउसाहेब नाथाजी जपे (रा. कनकुरी) यांचे चिरंजीव अ‍ॅड. सागर व श्री. राजेंद्र दगडू खरात (रा. निमगाव को., ता. राहाता) यांची कन्या रुपाली यांचा शुभविवाह प्रसंगी उपस्थित राहण्याचा योग आला. अनेक विवाह समारंभ पाहिले, पण या समारंभात भेट म्हणून एक छोटेसे रोपटे देण्यात आले. आज जागतिक पर्यावरण दिन आहे. आपणही येणाऱ्या काळात समारंभात शाल व फेट्याऐवजी झाडाचे रोपटे देऊन पाहुण्यांचा सन्मान करावा. निसर्गाचे संरक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण सर्वांनी झाडे लावण्याचा, पाणी वाचवण्याचा आणि प्रदूषण टाळण्याचा संकल्प करूया.
Image from Vivek Kolhe: भाग्योदय मंगल कार्यालय, डो-हाळे (ता. राहाता) येथे वै. ह. भ. प. भाउसाहे...
👍 🙏 10

Comments