शालेय शिक्षण
June 9, 2025 at 01:34 AM
🪴🏵️🦚🌻🌸💠🌹☘️🍁🌺🪴
*🫀पावसाळ्यात अंगाला खूप खाज येतेय, त्वचा लाल होते? १ उपाय करा, अजिबात खाज येणार नाही.🧠*
*🍁संदर्भ : हेल्थ मंत्रा ~ आरोग्य मंत्र*
*🖊️संकलन : प्रविण सरवदे, कराड,*
*⊰━━━━✥⊰༺☬༒☬༻⊱✥━━━━⊱*
पावसाळ्याच्या दिवसांत अंगाला खाज येण्याची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवते. खाज आल्यानंतर त्वचेवर लालसरपणा येतो याशिवाय पुरळसुद्धा येते. खाज येण्याची अनेक कारणं असतात. पावसाळ्याच्या दिवसांत पंख्याच्या हवेखाली जास्तवेळ झोपल्या नंतरही खूप खाज येते.
याशिवाय आहारात चिंच, डाळीचं पीठ, टोमॅटो, पालेभाज्या असे पदार्थ खाल्ल्यानंही खाज येते. लिव्हर मधून टॉक्सिन्स बाहेर येत असतील तेव्हाही हा त्रास होतो. याचा शित पित्त असेही म्हणतात. वेळीच या आजाराला रोखले नाही तर हा आजार पसरत जातो. खाज संपूर्ण अंगाला येत असेल तर तुम्हाला वाताचा त्रासही असू शकतो. याची वेळीच काळजी घेतली नाही तर एक्जिमामध्ये याचे रूपांतर होऊ शकते.
हळद कडुलिंबाच्या तेलात मिसळून याची पेस्ट बनवा ही पेस्ट ज्या ठिकाणी खाज येते तिथे लावा. काहीवेळ तसंच ठेवल्यानंतर धुवून घ्या तुम्हाला चांगला परिणाम दिसून येईल.
खाज असलेल्या ठिकाणी एलोवेरा जेल लावल्यास खाज इतरत्र पसरत नाही. एलोवेरा स्किनवर लावून जवळपास अर्धा लावून ठेवल्यानंतर धुवून टाका. कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. रोज २ ते ३ वेळा लावू शकता.
लवंगात असणारे एंटी बॅक्टेरिअल आणि एंटीऑक्सिडेंट्स गुण खाज कमी करण्यास मदत करतात. पण हे लावताना काळजी घ्यायला हवी. तुम्ही लवंगाचे तेल नारळाच्या तेलात मिसळून लावू शकता.
नारळाचे तेल अंगाला लावल्यानं खाजेपासून आराम मिळतो. याशिवाय नारळाचं तेल लावल्यानं तुम्हाला गारवा वाटतो.
*▣▬▬▬✥⊰༺☬༒☬༻⊱✥▬▬▬▣*
👍
1