शालेय शिक्षण
June 10, 2025 at 01:14 AM
|| श्री गणेशाय नमः ||
*🌳उद्याच्या पूजना बद्दलचे शंका समाधान..*
*१)वड पौर्णिमा कधी आहे? वड पूजन कधी आणि कोणत्या वेळेत करावे?*
❇️उद्या मंगळवार दि.१० जून रोजी वडपौर्णिमा आहे. या दिवशी पौर्णिमा सुरू झाल्या पासून (सकाळी ११.३५ नंतर) मध्यान्ह पर्यंत म्हणजे सुमारे १.३० वाजेपर्यंत पूजा करावी, तसेच त्या वेळेस जमले नाही तर सूर्यास्तापूर्वी (सायंकाळी ६.३० पूर्वी) लवकरात लवकर करावी.
*पौर्णिमा सहा घटिका पेक्षा अधिक व्यापिनी अशी चतुर्दशीने सिद्ध असलेली पौर्णिमा वडपूजनासाठी घ्यावी.* (संदर्भ : धर्मसिंधू पुष्ट क्रमांक ६१)
*२)बुधवारी पौर्णिमा दुपार पर्यंत असल्याने वड पूजन बुधवारी करता येईल का?*
❇️ *पौर्णिमा सहा घटिका पेक्षा अधिक व्यापिनी अशी चतुर्दशीने सिद्ध असलेली पौर्णिमा वडपूजनासाठी घ्यावी.* (संदर्भ : धर्मसिंधू पुष्ट क्रमांक ६१) अशी
चतुर्दशी युक्त पौर्णिमा मंगळवारी १० जून रोजी आहे म्हणून पूजन *मंगळवारीच* करावे.
❇️वड पूजन प्रतिपदा युक्त पौर्णिमेला करू नये असे शास्त्र आहे. बुधवारी प्रतिपदा युक्त पौर्णिमा असल्याने बुधवारी वडपूजन करू नये.
*३)वटपौर्णिमा पूजन कोणाला करता येते?*
✅वटपोर्णिमा व्रत हे सौभाग्यवती स्त्रिया करू शकतात.
✅गरोदर स्त्रीचे स्वास्थ्य ठीक असेल तर ९ व्या महिन्यापर्यंत वडपूजन करू शकते. शारीरिक परिस्थिती नुसार पूजन करावे अथवा खालील प्रमाणे घरच्या घरी पूजन करता येते.
✅ वटपोर्णिमा व्रत श्रीमती (विधवा) स्त्रिया करू शकतात.
✅वटपोर्णिमा व्रत मुलबाळ असलेल्या किंवा नसलेल्या स्त्रिया करू शकतात.(खाली संदर्भ दिला आहे).
*नारी वा विधवा वापि सुपुत्रा पुत्रवर्जिता । सभर्तृका सपुत्रीका कुर्याद्व्रतमिदं शुभम् ॥*
स्कंद पुराणातील वरील वचनानुसार वटसावित्री व्रताचा अधिकार सौभाग्यवती, विधवा,मूलबाळ असलेल्या अथवा नसलेल्या अशा सर्व स्त्रियांना आहे असे आपले धर्मशास्त्र सांगते.
*४)वटपौर्णिमा पूजनसाठी नक्षत्र,भद्रा इ. दोष असतात का?*
❇️वटपौर्णिमेच्या पूजेचा व भद्राचा काही संबंध नाही. भद्रा जरी असेल तरी वटपौर्णिमा पूजन करता येते.
*५) वटसावित्री पौर्णिमेस स्त्रियांची मासिक पाळी चालू असल्यास काय करावे?*
*❇️'रजस्वलादि दोषे स्वयं उपवासादिकं कार्यं पुजादि ब्राह्मण द्वारा कार्यम्!*
या वचनानुसार स्वतः उपवास करावा आणि पूजा इत्यादी ब्राह्मण द्वारा करून घ्यावी.
*६)प्रत्यक्षात वटवृक्षाची पूजा करणे काही कारणाने शक्य नसल्यास वड पौर्णिमा पूजन कसे करावे?*
❇️वड पौर्णिमा व्रता मध्ये "वटवृक्षाची" अथवा "वटवृक्षाच्या रोपाची" पूजा करावी असे आहे. *त्या वृक्षाच्या फांद्या तोडून आणून त्याची पूजा करू नये.*
❇️ वटवृक्षाची पूजा करणे काही कारणाने शक्य नसल्यास *(१) वडाच्या झाडाचे चित्र* किंवा *(२)ओल्या गंधाने किंवा हळदी कुंकवाने पाटावर वडाचे झाड (आकृती) काढून* त्याची सुद्धा पूजा करता येईल व त्या पाटाला किंवा फोटोला सूत गुंडाळता येईल.दुसर्या दिवशी गंधाच्या वड आकृती पाण्याने पुसावी.चित्र जपून ठेवावे नंतर वापरता येते व त्याचा सूत विसर्जित करावा.
*७)वडवृक्षाची पूजना मुळे एकच पती सात जन्म प्राप्त होतो का?*
❇️ हे सौभाग्यव्रत असून त्याच्या संकल्पात सात जन्म हाच पती मिळावा असा उल्लेख नाही. सौभाग्य याचा अर्थ पति, धनधान्य, ऐश्वर्य, आरोग्य, पुत्रपौत्र इ. असावे असा आहे.
❇️अधिक संदर्भ साठी व्रताचा संकल्प अभ्यासावा. यात एक पती सात जन्म मिळू दे..असा उल्लेख नाही..
*"मम भर्तुः पुत्राणां च आयुरारोग्य प्राप्तिद्वारा वैधव्यादि सकलदोष परिहारद्वारा ब्रह्मसावित्री प्रीत्यर्थं च वटसावित्रीव्रतं अहं करिष्ये.."*
*८)वड पौर्णिमा व्रत उपवास कधी करावा?*
❇️यावर्षी वटपौर्णिमेच्या व्रत उपवास मंगळवारी १० तारखेला करावा.
❇️ज्यांना दर महिन्याचे मासिक पौर्णिमेचा उपवास असतो तो त्यांनी बुधवरी ११ तारखेला करावा .
*🌷सौजन्याने :*
१)श्री दाते पंचांग
२)मा.श्री.अशोककाका कुलकर्णी
(धर्मशास्त्र अभ्यासक)
३)मा.श्री.अनिरुद्ध इनामदार
(धर्मशास्त्र अभ्यासक)