शालेय शिक्षण
June 10, 2025 at 03:21 PM
*❀ १० जून ❀*
*नेत्रतज्ञ डॉ. रामचंद्र भालचंद्र जन्मदिन स्मृतिदिन*
जन्म - १० जून १९२४ (धाराशिव)
स्मृती - १० जून १९७९
शासकीय सेवेत नेत्रचिकित्सक डॉ. रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांनी अहोरात्र काम केले. त्यांचा जन्म धाराशिव जिल्ह्यात १० जून १९२४ रोजी झाला. खडतर परिस्थितीवर मात करत त्यांनी जिद्द व चिकाटीच्या बळावर ऐंशी हजारांहून अधिक नेत्रचिकित्सा पूर्ण केल्या. अंधांचे जीवन प्रकाशमय करणाऱ्या या दीपस्तंभाची ज्योत १० जून १९७९ रोजीच मावळली. त्या दिवसाचे औचित्य म्हणून १९८२ पासून १० जून हा ‘दृष्टिदान’ दिवस म्हणून साजरा होतो. मात्र, हा दिवस दृष्टिदान दिन साजरा करताना अवघा महाराष्ट्राला डॉ. भालचंद्र यांचा विसर पडला आहे. उलट मराठवाड्यातील डॉ. रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांचा विसर महाराष्ट्राला पडला ही शोकांतिका आहे. त्यांच्या स्मृतीला उजाळा देणारा हा दिवस आहे. त्यांचे नेत्रदानाबाबत असलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी या दिवशी जनजागृती अभियान राबविली जाते.
*संकलन : मिलिंद पंडित, कल्याण*
*संदर्भ : इंटरनेट/लोकमत*