Samrat Abhay Thorat

Samrat Abhay Thorat

787 subscribers

Verified Channel
Samrat Abhay Thorat
Samrat Abhay Thorat
May 31, 2025 at 05:09 PM
https://www.facebook.com/share/p/1DE1Kz46eT/ "मान खाली घालून लाजायचं नायं, स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण घेऊन जिरवायचं!" #अहिल्याबाई_जयंती #महिला_सुरक्षा #स्वसंरक्षण_शिबिर दिनांक ३१ मे २०२५, शनिवार रोजी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त, त्यांच्या प्रेरणादायी कार्यातून प्रेरणा घेत महिलांसाठी मोफत आत्मसुरक्षा व स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. हा स्तुत्य उपक्रम सौ. ऐश्वर्या सम्राट थोरात आणि माझ्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला. यावेळी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन मा. आमदार हेमंतभाऊ रासने यांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच यावेळी मा. हेमंत भाऊंनी सांगितले की, मुली व महिलांच्या स्वसंरक्षणाची सुरुवात सम्राट दादा यांनी प्रभागात यांच्या मार्फत मोफत प्रशिक्षणाचा उपक्रम चालू करण्यात आला. पण हे प्रशिक्षण प्रत्येक महिला भगिनींना असणे आता अत्यंत काळाची गरज आहे. म्हणून कसबा मतदार संघात आणि संपूर्ण पुणे शहरामध्ये राबविण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. या प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षक श्री. आकाश बढे सर यांनी महिलांना आत्मसुरक्षेच्या महत्त्वपूर्ण तंत्रांचे मार्गदर्शन केले. स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिक सादरीकरण देखील उपस्थितांसमोर करण्यात आले, ज्यामुळे उपस्थित महिलांना प्रत्यक्ष अनुभवातून आत्मविश्वास मिळाला. या कार्यक्रमाला प्रभागातील नगरसेविका, प्रभाग क्र. १८ तसेच कसबा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रशिक्षण घेणाऱ्या महिला भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.
❤️ 👍 2

Comments