Samrat Abhay Thorat
June 7, 2025 at 04:46 PM
✨ स्नेह निमंत्रण ✨
"आपले सरकार योजना" माहिती व लाभ उद्घाटन समारंभ
आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरणारा "आपले सरकार योजना" माहिती व लाभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष मा. श्री. धीरजी घाटे यांच्या शुभहस्ते होणार आहे. प्रमुख उपस्थिती कसबा मतदार संघाचे आमदार हेमंत भाऊ रासने लाभणार आहेत. या उपक्रमात तुम्हाला केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळणार आहे, तसेच आपण कोणत्या योजनांना पात्र आहात हे देखील तांत्रिक व अचूक पद्धतीने समजणार आहे.
आपल्या हक्काच्या योजनांची माहिती घेण्यासाठी आणि त्याचा लाभ मिळवण्यासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमास नक्की उपस्थित राहावे,
• दिनांक : ९ जून २०२५
सोमवार रोजी
• वेळ : सायंकाळी ५:०० वाजता
• स्थळ : ३३२, गुरुवार पेठ, थोरात वाडा, पुणे
आपला विश्वासू,
सदैव आपल्याच सेवेत!
सम्राट अभय थोरात
मा.नगरसेवक, पुणे मनपा