Sanjay Uttamrao Deshmukh
May 27, 2025 at 02:16 PM
"Highway Man" यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
आज नागपुर येथे केंद्रिय रस्ते व वाहतूक मंत्री मा.ना.श्री.नितीन जी गडकरी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या.
विकासाचे शिल्पकार, आधुनिक भारताचे 'Highway Man', आणि देशाच्या अधोरेखित प्रगतीचे इंजिन असलेल्या गडकरी साहेबांचा दृष्टिकोन, कार्यशैली आणि व्यापक दृष्टी हे प्रेरणादायक आहेत.
त्यांनी देशातील महामार्गांच्या जाळ्याला वेग दिला, शेतकरी, वाहनचालक आणि व्यापारी यांचं जीवन अधिक सुलभ केलं. त्यांच्या नेतृत्वाखाली रस्ते केवळ वाहतुकीचे मार्ग न राहता, देशाच्या आर्थिक विकासाचे आधारस्तंभ बनले.
यावेळी त्यांच्या उत्तम आरोग्याची, दीर्घायुष्याची आणि पुढील काळातही देशसेवेसाठी सतत प्रेरणा देणारी भूमिका पार पाडावी, अशी मन:पूर्वक प्रार्थना केली.
#वाढदिवस #शुभेच्छा
❤️
1