Saleem Sarang
                                
                                    
                                        
                                    
                                
                            
                            
                    
                                
                                
                                May 20, 2025 at 06:21 PM
                               
                            
                        
                            https://www.facebook.com/share/p/1Adb6NhXso/?mibextid=wwXIfr
एकता सेवाभावी संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने मराठी पत्रकार भवन, आझाद मैदान, मुंबई येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ६० मान्यवरांचा राष्ट्रीय शिक्षणरत्न, सेवारत्न, समाजरत्न, कलारत्न आणि जीवन गौरव पुरस्काराने गौरव करण्यात आला. हा गौरव समारंभ राज्याचे सहकार मंत्री मा. ना. बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या प्रेरणादायी आणि भव्य कार्यक्रमास मी उपस्थित राहिलो. यावेळी माझा सत्कार करण्यात आला, तसेच आयोजकांनी दिलेल्या सन्मान सहृदय स्वीकारला.  समाजकार्याच्या वाटचालीत अशी मान्यता ही नव्या ऊर्जेसह जबाबदारीही वाढवणारी असते. या भव्य समारंभाचे मुख्य संयोजक व एकता सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. अजमत खान यांनी अत्यंत नियोजनबद्ध व प्रेरणादायी आयोजन केले होते. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजीनगर विभाग शिक्षक आमदार मा. आ. विक्रम काळे होते. विशेष अतिथी म्हणून पाथरी विधानसभा आमदार मा. आ. राजेश विटेकर, ज्येष्ठ संगीतकार मा. दिलीप सेन, प्रसिद्ध अभिनेत्री मा. उषा नाडकर्णी आणि फिल्म अभिनेता मा. अली खान यांची उपस्थिती होती. या प्रसंगी माजी विधान परिषद सदस्य मा. आ. रामरावजी वडकुते, माजी प्रथम महापौर परभणी मा. प्रताप भैय्या देशमुख, अल्पसंख्याक आयोग राज्य सदस्य मा. वसीम बुऱ्हाण, ज्येष्ठ समाजसेवक मा. पुरुषोत्तमजी श्रावगी (अकोला), मा. अबुबकर भाईजान (परभणी), मा. सतीष सस्ते (सातारा) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मा. अॅड. पवन निकम, मा. सय्यद अली, आदीजण उपस्थित होते.
Babasaheb Patil 
#saleemsarang #sarangspeaks #ncp #forthepeople.
                        
                    
                    
                    
                    
                    
                                    
                                        
                                            ❤️
                                        
                                    
                                    
                                        1