
Saleem Sarang
631 subscribers
Verified ChannelAbout Saleem Sarang
Director MAMFDC Govt of Maharashtra, Vice President NCP Maharashtra, President Muslim Welfare Association, Chairman Sarang Foundation.
Similar Channels
Swipe to see more
Posts

https://www.facebook.com/share/p/1YNqv594tc/?mibextid=wwXIfr भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता महोत्सव २०२५ रंग शारदा बांद्रा, मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मुंबई यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार यांच्या हस्ते झाली. प्रमुख पाहुणे मंत्री ना. छगन भुजबळ साहेब, प्रदेशाध्यक्ष मा.खा.सुनिल तटकरे साहेब, मा.आ.नवाब मलिक साहेब आदी दिग्गज नेत्यांचा उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमास उपस्थित राहिलो. पुरोगामी महाराष्ट्रात शिव शाहू फुले आंबेडकर यांचा समतावादी विचार पुढे घेऊन जायचं असेल तर अशा समतावादी कार्यक्रमांची नितांत गरज आहे. हे कार्यक्रम लोकांमध्ये संवेदनशीलता, जागरूकता आणि ऐक्याची भावना निर्माण करतात. कार्यक्रमात सहभागी होताना बाबासाहेबांच्या संघर्षमय वाटचालीचं आणि त्यांच्या समतेच्या मूल्यमापनाचं भान मनाला स्पर्शून गेलं. यावेळी ‘भीम गीतांचा सुरेल गजर’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाने संपूर्ण वातावरण भारून टाकलं. आदर्श शिंदे यांच्या सशक्त आणि भावस्पर्शी गायकीने उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण केलं. या सार्थ आयोजनामागे उभा राहिलेला प्रमुख चेहरा होता सिद्धार्थ कांबळे यांचा त्यांनी अत्यंत दर्जेदार आणि शिस्तबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम उभा केला. त्यांच्या दूरदृष्टीतून साकारलेला या कार्यक्रमाची पारंपरिक चौकटींपलीकडे जाऊन कार्यक्रमाची मांडणी केली, जिथे विचार, संस्कृती आणि सत्ताशक्ती यांचं समतोल सादरीकरण स्पष्टपणे दिसून आलं आणि म्हणूनच या उपक्रमाचं संपूर्ण श्रेय त्यांच्याकडे जातं. Ajit Pawar Sunil Tatkare Chhagan Bhujbal NCPSpeaks_Official #NCP #AjitPawar #babasahebambedkar #jaybhim #SaleemSarang #SunilTatkare #ChhaganBhujbal #ForThePeople.

https://www.instagram.com/reel/CztJS5myR9u/?igsh=eG1ncDRmNTJvMGJz.

https://www.facebook.com/share/p/1Adb6NhXso/?mibextid=wwXIfr एकता सेवाभावी संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने मराठी पत्रकार भवन, आझाद मैदान, मुंबई येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ६० मान्यवरांचा राष्ट्रीय शिक्षणरत्न, सेवारत्न, समाजरत्न, कलारत्न आणि जीवन गौरव पुरस्काराने गौरव करण्यात आला. हा गौरव समारंभ राज्याचे सहकार मंत्री मा. ना. बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या प्रेरणादायी आणि भव्य कार्यक्रमास मी उपस्थित राहिलो. यावेळी माझा सत्कार करण्यात आला, तसेच आयोजकांनी दिलेल्या सन्मान सहृदय स्वीकारला. समाजकार्याच्या वाटचालीत अशी मान्यता ही नव्या ऊर्जेसह जबाबदारीही वाढवणारी असते. या भव्य समारंभाचे मुख्य संयोजक व एकता सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. अजमत खान यांनी अत्यंत नियोजनबद्ध व प्रेरणादायी आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजीनगर विभाग शिक्षक आमदार मा. आ. विक्रम काळे होते. विशेष अतिथी म्हणून पाथरी विधानसभा आमदार मा. आ. राजेश विटेकर, ज्येष्ठ संगीतकार मा. दिलीप सेन, प्रसिद्ध अभिनेत्री मा. उषा नाडकर्णी आणि फिल्म अभिनेता मा. अली खान यांची उपस्थिती होती. या प्रसंगी माजी विधान परिषद सदस्य मा. आ. रामरावजी वडकुते, माजी प्रथम महापौर परभणी मा. प्रताप भैय्या देशमुख, अल्पसंख्याक आयोग राज्य सदस्य मा. वसीम बुऱ्हाण, ज्येष्ठ समाजसेवक मा. पुरुषोत्तमजी श्रावगी (अकोला), मा. अबुबकर भाईजान (परभणी), मा. सतीष सस्ते (सातारा) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मा. अॅड. पवन निकम, मा. सय्यद अली, आदीजण उपस्थित होते. Babasaheb Patil #SaleemSarang #sarangspeaks #ncp #ForThePeople.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02iN35tiAxBhqTwzD3qZceSf8etWEoUekCG5K1FJPmgrEaNXDj2e2CKbWW8TLqWDu5l&id=100069531925518&mibextid=wwXIfr आदरणीय श्री. छगन भुजबळ साहेब, आपण आज महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन! राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक व सर्वांगीण विकासात आपले योगदान अत्यंत मोलाचे आहे. नेतृत्वगुण, कार्यतत्परता व लोकाभिमुख दृष्टिकोनामुळे आपण नेहमीच जनतेच्या विश्वासास पात्र ठरलात. येत्या काळातही आपल्या अनुभवाचा व सक्रिय सहभागाचा महाराष्ट्राला निश्चितच लाभ होईल, यात दुमत नाही. आपल्या पुढील मंत्रीपदाच्या कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा. आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व अखंड जनसेवेची ऊर्जा मिळो. हीच सदिच्छा..! #SaleemSarang #ChhaganBhujbal #NCP

https://www.facebook.com/share/p/16TpAcfowi/?mibextid=wwXIfr

https://www.instagram.com/reel/DJlsoT-szCR/?igsh=MTh6dWMyZDZ6OXAyeQ==.

https://www.facebook.com/share/p/1MQ5JGYeqR/?mibextid=wwXIfr