
Saleem Sarang
May 21, 2025 at 05:40 AM
https://www.facebook.com/share/p/1YNqv594tc/?mibextid=wwXIfr
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता महोत्सव २०२५ रंग शारदा बांद्रा, मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मुंबई यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार यांच्या हस्ते झाली. प्रमुख पाहुणे मंत्री ना. छगन भुजबळ साहेब, प्रदेशाध्यक्ष मा.खा.सुनिल तटकरे साहेब, मा.आ.नवाब मलिक साहेब आदी दिग्गज नेत्यांचा उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमास उपस्थित राहिलो. पुरोगामी महाराष्ट्रात शिव शाहू फुले आंबेडकर यांचा समतावादी विचार पुढे घेऊन जायचं असेल तर अशा समतावादी कार्यक्रमांची नितांत गरज आहे. हे कार्यक्रम लोकांमध्ये संवेदनशीलता, जागरूकता आणि ऐक्याची भावना निर्माण करतात.
कार्यक्रमात सहभागी होताना बाबासाहेबांच्या संघर्षमय वाटचालीचं आणि त्यांच्या समतेच्या मूल्यमापनाचं भान मनाला स्पर्शून गेलं. यावेळी ‘भीम गीतांचा सुरेल गजर’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाने संपूर्ण वातावरण भारून टाकलं. आदर्श शिंदे यांच्या सशक्त आणि भावस्पर्शी गायकीने उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण केलं. या सार्थ आयोजनामागे उभा राहिलेला प्रमुख चेहरा होता सिद्धार्थ कांबळे यांचा त्यांनी अत्यंत दर्जेदार आणि शिस्तबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम उभा केला. त्यांच्या दूरदृष्टीतून साकारलेला या कार्यक्रमाची पारंपरिक चौकटींपलीकडे जाऊन कार्यक्रमाची मांडणी केली, जिथे विचार, संस्कृती आणि सत्ताशक्ती यांचं समतोल सादरीकरण स्पष्टपणे दिसून आलं आणि म्हणूनच या उपक्रमाचं संपूर्ण श्रेय त्यांच्याकडे जातं.
Ajit Pawar Sunil Tatkare Chhagan Bhujbal
NCPSpeaks_Official
#ncp #ajitpawar #babasahebambedkar #jaybhim #saleemsarang #suniltatkare #chhaganbhujbal #forthepeople.
👍
1