डिजिटल शेतकरी
May 29, 2025 at 05:27 AM
*शेतीमालाच्या किमान आधारभूत किंमतीत मोठी वाढ; कोणत्या पिकाला किती दर? वाचा सविस्तर*
*🌾डिजिटल शेतकरी🌾*
नवी दिल्ली येथे आज (ता.२८) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने २०२५-२६ च्या विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या १४ वाणांसाठी किमान आधारभूत किमती (एमएसपी) मध्ये वाढ करण्यास मान्यता दिली आहे.शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनासाठी किफायतशीर किंमत मिळावी या उद्देशाने सरकारने २०२५-२६ च्या विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वृद्धी केली आहे.मागील वर्षाच्या तुलनेत किमान आधारभूत किमतीत सर्वाधिक वाढ कारळे (नायजर बियाणे) (प्रति क्विंटल ८२० रुपये), त्यानंतर नाचणी (प्रति क्विंटल ५९६ रुपये), कापूस (प्रति क्विंटल ५८९ रुपये) आणि तीळ (प्रति क्विंटल ५७९ रुपये) करण्याची शिफारस केली आहे.
*२०२५-२६ च्या विपणन हंगामासाठी सर्व खरीप पिकांची किमान आधारभूत किंमत (प्रति क्विंटल रुपये)*
अ.क्र. शेतमाल किमान आधारभूत किंमत (२०२५-२६) किमान आधारभूत किंमत (२०२४-२५) वाढ
१ भात (सामान्य) २३६९ २३०० ६९
भात (ग्रेड अ) २३८९ २३२० ६९
२ ज्वारी (हायब्रिड) ३६९९ ३३७१ ३२८
ज्वारी (मालदांडी) ३७४९ ३४२१ ३२८
३ बाजरी २७७५ २६२५ १५०
४ नाचणी ४८८६ ४२९० ५९६
५ मका २४०० २२२५ १७५
६ तूर ८००० ७५५० ४५०
७ मूग ८७६८ ८६८२ ८६
८ उडीद ७८०० ७४०० ४००
९ भुईमूग ७२६३ ६७८३ ४८०
१० सूर्यफूल (बियाणे) ७७२१ ७२८० ४४१
११ सोयाबीन पिवळा ५३२८ ४८९२ ४३६
१२ तीळ ९८४६ ९२६७ ५७९
१३ कारळे ९५३७ ८७१७ ८२०
१४ कापूस (मध्यम स्टेपल) ७७१० ७१२१ ५८९
कापूस (लांब स्टेपल) ८११० ७५२१ ५८९
*शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा*
https://whatsapp.com/channel/0029Va9EXB0KbYMM1tGbBz0W
😢
2