डिजिटल शेतकरी WhatsApp Channel

डिजिटल शेतकरी

6.3K subscribers

About डिजिटल शेतकरी

नमस्कार ! मी दाणे आदिनाथ मी तुमच्या डिजिटल शेतकरी या न्युज चॅनलवर स्वागत करत आहे. या चॅनल वर तुम्हाला काय मिळू शकता ? १ रोज सकाळच्या ताज्या बातम्या २ शेती विषयक माहिती तसेच पिकांवरील रोगराई व उपाय योजना , खते औषधे फवारणी माहिती. ३ गाय, म्हैस, शेळी, मेंढी, कोंबडी याविषयी माहिती त्यांना येणारे आजार व त्यावर उपाययोजना ४ महाराष्ट्रातील सर्व शेतकरी सरकारी योजना ५ हवामान अंदाज , जॉब अपडेट, राशिभविष्य तसेच वेळोवेळी शैक्षणिक माहिती आणि बरेच काही तुम्ही आजच या चॅनल ला जॉईन फॉलो करा त्यामुळे तुम्ही कोणत्याहि योजनेपासून वंचित राहणार नाही, तुम्हाला आम्ही वेळोवेळी माहिती देत राहू....

Similar Channels

Swipe to see more

Posts

डिजिटल शेतकरी
डिजिटल शेतकरी
6/15/2025, 12:19:44 PM

*🍀वेदनामुक्ती अभियान🍀* 🤔 *तुम्हाला कंबरदुखी, मानदुखी, गुडघेदुखी, पाठदुखी, संधिवात, सायटिका, हाता-पायात मुंग्या येणे, कॅल्शियम कमी होणे, हाडांमधून कटकट आवाज येणे, माकड हाड दुखणे, उठताना बसताना त्रास होणे असे अनेक त्रास आपल्याला आहेत का...?* https://chat.whatsapp.com/K5wKFEs0cUE9sLVfro2dc7 🫵 *आपण वेगवेगळ्या प्रकारची औषधे घेऊन कंटाळलात का...?* 🫵 💁‍♀️ *ऑपरेशन करण्याच्या विचारात आहात का ?* *📞 तर नक्की एकदा आमच्याशी बोला हमखास फायदा होईल...* 💁‍♀️ *8-10 दिवसात फरक अनुभवा...!!! *या सर्व व्याधींवर* _*"सुपर 30 + ॲडव्हान्स किट टेबलेट आणि ऑईल"*_ *आयुर्वेदिक औषध सर्वोत्तम आणि गुणकारी उपाय...*✨ *किट चे फायदे*👇🏻👇🏻👇🏻 _*🪴सांध्यातील तेलाची ( वंगण ) निर्मिती करण्यास मदत करते.*_ _*🪴सुज व वेदना कमी होतात.*_ _*🪴पाचनक्षमता सुधारते.*_ _*🪴कॅल्शियम आणि जीवनसत्वांची कमतरता भरून निघण्यास मदत करते.*_ _*🪴तुटलेल्या हाडांचा ताण कमी करून हाडांची ताकद वाढण्यासाठी मदत करते.*_ _*🪴हाता-पायातील मुंग्या कमी करण्यासाठी मदत करते.*_ _*🪴टाच दुखीला आराम पडतो*_ _*🪴 झोप शांत लागते*_ *टीप* _*🌿गुडघेदुखी ला कंटाळला असाल किंवा गुडघ्याचे ऑपरेशन करण्याची वेळ आली असेल.*_ _*🌿कसलीही काळजी करू नका.जॉइंट च्या कुठल्याही ऑपरेशन ने व्यक्ती बरी होत नाही तर ती कायमची अधू होते.*_ _*🌿ऑपरेशन हा शेवटाचा पर्याय असल्यामुळे ऑपरेशन करू नका.*_ _*🌿ऑपरेशन टाळा.*_ _*🌿शरीराला होणाऱ्या असह्य वेदनांना द्या आता कायमचा आराम.*_ *महत्त्वाची सूचना* हा मॅसेज जास्तीत जास्त गरजू व्यक्ती, वयोवृद्ध व्यक्ती, नातेवाईक, आई वडील, मित्र मैत्रीण यांना पाठवा. *अधिक माहितीसाठी पेशंट चे ऑडियो आणि व्हिडीओ पाहण्यासाठी आजच आमच्या व्हॉटसअप ग्रुप ला जॉईन करा.👇🏻👇🏻👇🏻* https://chat.whatsapp.com/K5wKFEs0cUE9sLVfro2dc7 *🚚 📦 संपूर्ण भारतात कुरियर सेवा उपलब्ध.* *☺️ चला तर मग वेदना मुक्त आयुष्य जगूया...* *त्याकरिता आजच संपर्क करा व शारीरिक त्रासातून मुक्त व्हा...!!!* अधिक माहिती साठी संपर्क करा.👇🏻👇🏻 _*📞प्रीती मॅडम - 9373013866*_advt

👍 🙏 2
डिजिटल शेतकरी
डिजिटल शेतकरी
6/15/2025, 3:03:30 AM

*पीएम किसान योजनेतील 'या' शेतकऱ्यांकडून होतेय हफ्त्यांची वसुली!* *🌾डिजिटल शेतकरी🌾* पुढील काही दिवसांत पीएम किसान सन्मान (PM Kisan) निधीचा २० वा हप्ता येणार आहे. दरम्यान, अपात्र शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीएम किसान योजनेच्या रकमेची वसुली केली जात आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून देखील वसुली केली जात आहे. अनेक शेतकरी पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Scheme) २० व्या हफ्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. या महिन्यात हा हफ्ताही वितरित होणार असल्याची शक्यता आहे. मात्र तत्पूर्वी जे अपात्र शेतकरी आहेत, त्यांच्याकडून पीएम किसान (PM Kisan Yojana) हफ्त्यांची वसुली करण्याची मोहीम सुरु आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना आधी योजनेतून बाद केले जाणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे या मोहिमेला फारसा प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे. या मोहिमेतील अधिकारी वसुलीवर जास्त भर देत नसल्याचे दिसून येत आहे. कारण वसुलीसाठी अद्याप कोणतीही ठोस कायदेशीर तरतूद नाही. कारण हे काम पूर्णपणे ऐच्छिक आहे. म्हणजेच, शेतकऱ्यांना स्वतः पैसे परत करण्याचे निर्देश दिले आहेत. तर सरकारने त्यांची आधी पडताळणी करून या योजनेतून का काढून टाकले नाही, असे विचारत आहेत. *अशी मोहीम सुरु आहे.* या योजनेतून अपात्र शेतकऱ्यांना वगळण्यासाठी सरकारने जमिनीच्या नोंदी पडताळणी सुरू केली आहे. याशिवाय पाच टक्के शेतकऱ्यांची प्रत्यक्ष पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. ई-केवायसी आवश्यक झाले आहे. ग्रामसभेतील लाभार्थ्यांच्या यादीचे ऑडिट करून ती पंचायतींमध्ये प्रदर्शित करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. जेणेकरून लोकांना अपात्र शेतकऱ्यांबद्दल माहिती मिळू शकेल. *पीएम किसानमध्ये एवढी रक्कम वसूल* या योजनेत सहभागी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना उच्च उत्पन्न गट असलेले जसे की आयकरदाते, सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी, राज्य/केंद्र सरकार, घटनात्मक पद धारक लाभार्थी शेतकरी अपात्र आहेत. अशा देशभरातील अपात्र लाभार्थ्यांकडून ४१६ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. *शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी व्हाट्सअप चैनल ला फॉलो करा* https://whatsapp.com/channel/0029Va9EXB0KbYMM1tGbBz0W

👍 3
डिजिटल शेतकरी
डिजिटल शेतकरी
6/16/2025, 8:40:10 AM

*राज्यासाठी पुढील 48 तास धोक्याचे, मुसळधार पावसाचा अंदाज; अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा* *🌾डिजिटल शेतकरी🌾* पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागात हवामानात मोठा बदल जाणवत आहे. मागील 48 तासांत मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाने जोर धरला आहे. मात्र गारवा न वाढता उकाडा कायम आहे. पश्चिम किनारपट्टीवर मोसमी वाऱ्यांचा जोर वाढल्याने कोकण व अरबी समुद्रावर चक्रीय स्थिती निर्माण झाली असून, हवामान विभागाने पुढील 48 तास अत्यंत धोक्याचे असल्याचा हायअलर्ट जारी केला आहे. *कोकण व मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा* हवामान विभागानुसार, 16 आणि 17 जून रोजी कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर संततधार पावसासह काही भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. विशेषतः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये 16 ते 18 जून दरम्यान मध्यम ते तीव्र पाऊस, तर काही भागांत अत्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे वाहणार असल्यामुळे नागरिकांना सुरक्षिततेची विनंती करण्यात आली आहे. *मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पाऊस* मुंबई, ठाणे आणि पालघर येथे 16 जून रोजी मध्यम ते तीव्र पाऊस अपेक्षित आहे. 17 ते 19 जूनदरम्यान या भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील. समुद्रकिनारी आणि निचऱ्याच्या भागात विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा घाटमाथ्यावरही पावसाचा जोर पुणे, कोल्हापूर आणि सातारा घाटमाथ्यावर 16 ते 19 जून दरम्यान काही ठिकाणी मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता आहे. या शहरांमध्ये मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. *उत्तर महाराष्ट्र आणि नाशिक भागात पावसाचा इशारा* नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये 16 जून रोजी काही ठिकाणी मुसळधार पाऊस, तर 17 ते 19 जून दरम्यान हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. सोलापूरमध्ये 16 जून रोजी 30-40 किमी/तास वेगाने वादळी वाऱ्यांसह पाऊस होणार आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव** या जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे. *मराठवाडा आणि विदर्भात हवामान अस्थिर* मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये 16 जून रोजी वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस, तर 17 ते 19 जूनदरम्यान हलक्या सरी पडतील. विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा इ. जिल्ह्यांमध्ये 16 जून रोजी 40-50 किमी/तास वेगाने वारे आणि मेघगर्जनेसह पाऊस, तर 17 ते 19 जूनदरम्यान काही भागात मुसळधार ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. *सावध राहा! - हवामान विभागाचं आवाहन* हवामान विभागाने नागरिकांना आवाहन केलं आहे की, अत्यावश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. प्रशासनाने देखील संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. *शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी व्हाट्सअप चैनल ला फॉलो करा* https://whatsapp.com/channel/0029Va9EXB0KbYMM1tGbBz0W

डिजिटल शेतकरी
डिजिटल शेतकरी
6/16/2025, 3:34:05 AM

*घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!* *🌾डिजिटल शेतकरी🌾* कृषी कर्जात ५ वर्षांत महाराष्ट्र प्रमुख राज्य म्हणून उदयास आले आहे. २०१९-२० ते २०२३-२४ दरम्यान राज्यातील कृषी कर्ज ८१,८५० कोटींवरून १,६८,५४७ कोटींपर्यंत म्हणजे जवळजवळ दुप्पट आहे. महाराष्ट्राने कृषी वित्तपुरवठा वाढवण्यासाठी केलेल्या एकत्रित प्रयत्नांचे हे यश मानले जाते. तथापि, प्रत्येक कृषी कुटुंबाच्या थकीत कर्जाचा भार चिंतेचा विषय आहे. वित्त मंत्रालयाच्या मते, २०२३-२४ दरम्यान महाराष्ट्रात दिलेल्या कृषी कर्जात ७४ टक्के वाटा अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचा होता. दुर्बल घटकांपर्यंत मदत जात असल्याचे यातून स्पष्ट होते. *राज्य- कर्ज वाटप (सरासरी कर्ज)* महाराष्ट्र- १,६८,५४७ कोटी (४९,२७० रुपये) पंजाब- ९५,६८७ कोटी (९६,१७७ रुपये) हरयाणा- ८९,३९६ कोटी (६४,२६० रुपये) *...तोवर कर्जचक्र कायम* सरकारने तारणमुक्त कर्जाची मर्यादा १.६ लाखांवरून दोन लाखांपर्यंत वाढवली, याचे शेतकरी नेत्यांनी स्वागत केले; परंतु पीक उत्पन्न व बाजारपेठ यावर भर दिला आहे. पतपुरवठा सुधारला; परंतु बाजारपेठ सहज उपलब्धत होत नाही तोपर्यंत कर्जचक्र कायम राहील, असे महाराष्ट्रातील एका शेतकरी नेत्याने सांगितले. *शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी व्हाट्सअप चैनल ला फॉलो करा* https://whatsapp.com/channel/0029Va9EXB0KbYMM1tGbBz0W

डिजिटल शेतकरी
डिजिटल शेतकरी
6/15/2025, 2:58:25 AM

*विदर्भात मान्सूनची दमदार एन्ट्री; पुढील ५ दिवस यलो अलर्ट वाचा सविस्तर* *🌾डिजिटल शेतकरी🌾* विदर्भातील उकाड्याने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना अखेर मृग नक्षत्राने दिलासा दिला आहे. हवामान विभागाने (IMD) पुढील ५ दिवसांसाठी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करत यलो अलर्ट जारी केला आहे. मृग नक्षत्राच्या आगमनानंतर अखेर विदर्भात मान्सून सक्रिय झाला असून, पुढील आठवडाभर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने (IMD) व्यक्त केला आहे. शनिवार १४ जूनपासून ते बुधवार १८ जूनपर्यंत अमरावती विभागातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविली गेली आहे.आता खरीप हंगामाला गती मिळण्याची शक्यता आहे *उशिरा का होईना, मृगाचा जोरदार प्रवेश* १२ जून रोजी दुपारनंतर अमरावती विभागातील अनेक भागांत मृग नक्षत्राचा पाऊस कोसळला. यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला, तसेच पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांमध्येही आशेचा किरण दिसू लागला आहे. यापूर्वी, मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतरही १२ जूनपर्यंत बराचसा भाग कोरडा होता. *पेरणीसाठी योग्य संधी* पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला असून, येत्या काही दिवसांत पेरणीला गती येण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मंगळवारनंतर पावसाचा जोर अधिक वाढणार आहे, त्यामुळे खरीप हंगामाच्या सुरुवातीसाठी ही संधी अत्यंत महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांनी योग्य वेळ साधून पेरणीची तयारी ठेवावी, असे कृषी विभागाचे आवाहन आहे. प्रशासनाकडून सतर्कतेचे निर्देश हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, विजांच्या कडकडाटासह वादळी वारे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी. शेतीसाठी काम करताना वीजपुरवठा सुरु असेल, तर कामे थांबवावीत आणि सुरक्षित आश्रयस्थानी थांबावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. *शेतकऱ्यांना दिलासा* मान्सूनची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना हा पाऊस दिलासा देणारा ठरणार आहे. लागवडीच्या तयारीला आता वेग येण्याची शक्यता असून, चांगल्या सुरुवातीसाठी शेतकरी सज्ज आहेत. *शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी व्हाट्सअप चैनल ला फॉलो करा* https://whatsapp.com/channel/0029Va9EXB0KbYMM1tGbBz0W

डिजिटल शेतकरी
डिजिटल शेतकरी
6/16/2025, 3:52:21 AM

*तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक* *🌾डिजिटल शेतकरी🌾* गेल्या काही दिवसांमध्ये वैवाहिक आणि कौटुंबिक संबंधातील वादविवादातून होणाऱ्या गुन्ह्यांच्या अनेक घटना समोर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील महाराजगंज जिल्ह्यातून सर्वांना अवाक् करणारी एक घटना समोर आली आहे. येथे एका प्रियकराने त्याच्या मृत प्रेयसीच्या मृतदेहासोबत लग्न केलं. यावेळी लग्न लावण्यासाठी उपस्थित असलेल्या पुरोहितांनाही मंत्र म्हणणे जड गेले. तर उपस्थित नातेवाईकांना अश्रू अनावर झाले. महाराजगंज जिल्ह्यातील निचलौल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाने आपलं दुकान सुरू केलं होतं. यादरम्यान, तो तिथेच घरमालकाच्या मुलीच्या प्रेमात पडला. दोघांच्या प्रेमप्रकरणाबाबत कळलं तेव्हा सुरुवातीला कुटुंबीयांनी नकार दिला. मात्र दोघांनीही हट्ट केल्याने अखेर नातेवाईकांनी या लग्नाला मान्यता दिली. मात्र नंतर काही कारणाने या तरुणीने गळफास घेत जीवन संपवलं. प्रेयसीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच तरुणाला धक्का बसला. तो शोकाकुल अवस्थेत प्रेयसीच्या घरी पोहोचला. मी तिला पत्नी बनवण्याचं वचन दिलं होतं, मी आता तिच्यासोबत संसार करू शकत नाही, पण तिची अंत्ययात्रा विवाहित म्हणून निघेल, असं त्याने तिच्या नातेवाईकांना सांगितलं. त्याचं हे बोलणं ऐकून नातेवाईक अवाक् झाले. काही वेळ विचार केल्यावर त्यांनी या लग्नाला मान्यता दिली. अखेर शोकाकुल वातावरणातच एका पुरोहितांना बोलावण्यात आले. त्यानंतर या तरुणाने त्याच्या प्रेयसीच्या मृतदेहासोबत लग्न केले. यावेळी उपस्थितांना अश्रू अनावर झाले. आता या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. *शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी व्हाट्सअप चैनल ला फॉलो करा* https://whatsapp.com/channel/0029Va9EXB0KbYMM1tGbBz0W

👍 😂 😮 🙏 4
डिजिटल शेतकरी
डिजिटल शेतकरी
6/17/2025, 12:27:25 AM

*🌾डिजिटल शेतकरी बातमीपत्र 🌾* 🖋️'काहींना गल्लीपासून दिल्लीपर्यंत आरोप करण्याची सवय'; मुख्यमंत्री फडणवीस यांचा संजय राऊत यांना टोला 🖋️'राज्य नेहमीच महिलांच्या सक्षमीकरणाकरिता प्रयत्नशील तर उन्नतीसाठी वचनबद्ध'; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं प्रतिपादन 🖋️कुंडमळा येथील इंद्रायणी पूल दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू तर ५१ जण जखमी; मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांकडून जाहीर 🖋️केंद्र सरकारकडून जातनिहाय जनगणेची अधिसूचना जारी; २०२७ ला होणार जनगणना 🖋️एअर इंडियाच्या विमानात पुन्हा तांत्रिक बिघाड; हॉंगकॉंग विमानतळावरून उड्डाण केलेलं विमान तांत्रिक बिघाडामुळे माघारी परतलं 🖋️बच्चू कडू अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरुन अपात्र; विभागीय सहनिबंधकांचा मोठा निर्णय 🖋️राज्यातील धोकादायक पुलांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करा; उपसभापती नीलम गोऱ्हेंची मागणी 🖋️९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शिवेंद्रसिंहराजे भोसले; साहित्य महामंडळाची घोषणा 🖋️टीम इंडियाला मोठा धक्का; इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या १९ वर्षाखालील भारतीय संघातील २ खेळाडू जखमी 🖋️अमेझॉन एमजीएम स्टुडिओजकडून 'निशांची' चित्रपटाची तारीख जाहीर; ऐश्वर्या ठाकरे यांचे चित्रपटसृष्टीत दमदार पदार्पण *शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी व्हाट्सअप चैनल ला फॉलो करा* https://whatsapp.com/channel/0029Va9EXB0KbYMM1tGbBz0W ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🎯डिजिटल शेतकरी वर जाहिरात करण्यासाठी संपर्क -7972054779*

डिजिटल शेतकरी
डिजिटल शेतकरी
6/16/2025, 10:03:57 AM

*दीड एकर शेवग्यापासून लाखोंची कमाई; शेंग नाही, पानांची पावडर ठरली गेमचेंजर, जाणून घ्या शेतकऱ्याने कसं केलं नियोजन?* *🌾डिजिटल शेतकरी🌾* सध्या शेतीमध्ये पारंपरिक पद्धतींपासून दूर जात अनेक शेतकरी नवे प्रयोग करत आहेत. अशीच एक प्रेरणादायक यशोगाथा आहे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील चिंचोली गावातील शेतकरी हणमंत लोंढे यांची. ते गेल्या 15 वर्षांपासून पारंपरिक पिकांची शेती करत होते, मात्र उत्पादन व नफा समाधानकारक नव्हता. त्यामुळे त्यांनी नवे पीक घेण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे त्यांनी शेवग्यासारख्या सर्वसामान्य वाटणाऱ्या पिकातून मोठी कमाई केली आहे, ती सुद्धा केवळ शेंगांमधून नाही, तर पानांपासून बनवलेल्या औषधी पावडरीमधून! हणमंत लोंढे यांनी केवळ दीड एकर क्षेत्रात देशी शेवग्याची लागवड केली. शेवगा ही झाडं कमी पाणी, कमी देखभाल आणि हवामानाला सहन करणारी असल्याने दुष्काळग्रस्त भागातही ती सहज टिकते. शेवग्याच्या झाडापासून केवळ शेंगाच नाही, तर पाने, फुले, बिया आणि अगदी खोडाचा उपयोग देखील होतो. लोंढे यांनी शेवग्याच्या पानांपासून पावडर बनवण्याचा मार्ग स्वीकारला. त्यासाठी पाने कापल्यानंतर त्यातील खराब, किडलेली व पिवळी पाने वेगळी केली जातात. स्वच्छतेसाठी ही पाने गरम पाणी व मीठ टाकून धुतली जातात. त्यानंतर ती निर्जंतुक करून वाळवली जातात व शेवटी पावडर तयार केली जाते. ही पावडर 3 वर्षांपर्यंत टिकाऊ असते. शेवग्याच्या या उत्पादनाला औषधी गुणधर्म आहेत. हणमंत लोंढे यांनी 'शिवांजली फॉर्म ॲन्ड हर्बल' या नावाने फर्मची नोंदणी केली असून त्यांनी "फायटर मोरिंगा पावडर" या नावाने उत्पादन सुरू केले आहे. ही पावडर 50 ग्रॅमपासून 1 किलोपर्यंतच्या पॅकमध्ये मिळते. बाजारात या पावडरची चांगली मागणी असून गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, शुगर, ब्लड प्रेशर, थायरॉईड यांसारख्या अनेक आजारांवर ही उपयोगी असल्याचे सांगितले जाते. यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढला आहे. सध्या हणमंत लोंढे यांची पावडर सोलापूरसह पुणे, मुंबई, धाराशिव, सांगली यांसारख्या जिल्ह्यांमध्ये आणि कर्नाटक, बेंगळुरू, हैदराबादसारख्या राज्यांमध्ये कुरिअरद्वारे ग्राहकांना पोहोचवली जाते. त्यांना ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने ऑर्डर मिळतात. विशेष म्हणजे दीड एकर शेवग्याच्या प्लॉटमधून त्यांनी दीड वर्षाच्या कालावधीत जवळपास दोन लाख रुपये निव्वळ नफा मिळवला आहे. हा नफा त्यांनी शेतात कोणताही मोठा खर्च न करता केवळ कल्पकतेच्या जोरावर मिळवला आहे. *शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी व्हाट्सअप चैनल ला फॉलो करा* https://whatsapp.com/channel/0029Va9EXB0KbYMM1tGbBz0W

👍 1
डिजिटल शेतकरी
डिजिटल शेतकरी
6/15/2025, 3:00:20 AM

*तुमची रेशनकार्ड केवायसी झाली नसल्यास काळजी करू नका, 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ मिळाली* *🌾डिजिटल शेतकरी🌾* शासनाकडून शिधापत्रिकेवर धान्य मिळविण्यासाठी शिधापत्रिका धारकांना ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली होती. ३० एप्रिलपर्यंत त्यासाठी अंतिम मुदत दिली होती.मात्र, मुदत संपल्यानंतरही राज्यातील अनेक शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी प्रक्रिया बाकी असल्याने अखेर शासनाकडून ई-केवायसीसाठी ३० जूनपर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण ३८ लाख ७३ हजार ३०५ शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे पुरवठा विभागासमोर लक्ष्य होते. त्यापैकी ३० लाख ४२ हजार १०१ शिधापत्रिका-धारकांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असून, आठ लाख ३१ हजार २०४ शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप बाकी आहे. जिल्ह्यात ७८ टक्के शिधापत्रिकाधारकांची ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. *मेरा-केवायसी ॲप वापरावे* ई-केवायसी करण्यासाठी शासनाने मेरा केवायसी ॲप विकसित केले आहे. या ॲपवर ओटीपीद्वारे इतर माहिती भरणे अनिवार्य आहे. सर्व माहिती भरून प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. या ॲपवर शिधापत्रिकाधारकांना आधार आधारित फेस व्हेरिफिकेशन करावे लागते. तसेच ओटीपी व्हेरिफिकेशनसाठी वापरकर्त्याला त्याचा आधार क्रमांक टाकावा लागेल. शिधापत्रिकेवर धान्य मिळविण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक आहे. ज्यांची ई-केवायसी प्रक्रिया बाकी आहे त्या शिधापत्रिकाधारकांनी प्रक्रिया मुदतीच्या आत पूर्ण करून घ्यावी. - कैलास पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी (प्रभारी) *शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी व्हाट्सअप चैनल ला फॉलो करा* https://whatsapp.com/channel/0029Va9EXB0KbYMM1tGbBz0W

❤️ 2
डिजिटल शेतकरी
डिजिटल शेतकरी
6/15/2025, 2:54:36 AM

*CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू* *🌾डिजिटल शेतकरी🌾* राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस परीक्षा पुन्हा एकदा घेण्यात येणार असून या परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया आता सुरू झाली आहे. यापूर्वी या अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना आता पुन्हा सीईटी परीक्षा देण्यासाठी २० जूनपर्यंत नोंदणी करता येणार आहे. सीईटी सेलने २९ एप्रिल ते ३० एप्रिलदरम्यान बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस या अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षा घेतली होती. त्यात ६१,६६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून या अभ्यासक्रमांच्या कॉलेजांमध्ये जवळपास १ लाख ५ हजार जागा आहेत. त्यातूनही परीक्षा दिलेल्यांपैकी निम्म्याच विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले असल्याने अनेक कॉलेजांतील जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहणार आहेत. त्यामुळे यापूर्वी परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा नव्याने सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचे वेळापत्रक सीईटी सेलने जाहीर केले आहे. दरम्यान, परीक्षेची तारीख नोंदणी प्रक्रियेनंतर जाहीर केली जाणार आहे. यापूर्वी बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस या अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षा देऊ न शकलेले विद्यार्थी नव्या सीईटी परीक्षेसाठी अर्ज करु शकतील. त्याचबरोबर यापूर्वी सीईटी परीक्षा दिली आहे, मात्र पुन्हा सीईटी परीक्षा देण्याची इच्छा आहे या विद्यार्थ्यांनाही संधी देण्यात आली आहे. यापूर्वी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे दोन्ही सीईटी परीक्षांपैकी ज्या परीक्षेत सर्वोत्तम पर्सेंटाईल गुण असतील ते प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जातील. *शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी व्हाट्सअप चैनल ला फॉलो करा* https://whatsapp.com/channel/0029Va9EXB0KbYMM1tGbBz0W

Link copied to clipboard!