डिजिटल शेतकरी
डिजिटल शेतकरी
May 31, 2025 at 03:15 AM
*हलक्यात नका घेऊ 'ही' लक्षणं, शरीरात पाणी कमी झाल्याचे असू शकतात संकेत...* *🌾डिजिटल शेतकरी🌾* शरीराला पाण्याची किती गरज असते हे काही कुणाला वेगळं सांगण्याची गरज नाही. पाण्याशिवाय शरीर चालूच शकत नाही. चालू काय व्यक्ती जिवंतच राहू शकत नाही. त्यामुळे एक्सपर्ट दिवसभपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. जर दिवसभर पुरेसं पाणी पित नसाल तर तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते. म्हणजे शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होतं. उन्हाळ्यात किंवा खूप गरमी असताना शरीरात पाणी कमी होण्याचा धोका अधिक वाढतो. शरीरात पाणी कमी झालं तर चक्कर येते, कमजोरी जाणवते. स्थिती आणखी गंभीर होईल त्याआधीच शरीर पाणी कमी झाल्याचे काही संकेत देतं. या संकेतांकडे वेळीच लक्ष दिलं तर समस्या वाढणार नाही. योगा एक्सपर्ट मयुर कार्तिक यांनी याबाबतच एक व्हिडीओ इन्स्टावर शेअर केला आहे. ज्यात त्यांनी सांगितलं की, शरीरात पाणी कमी झाल्यावर कोणकोणते संकेत दिसतात. जर तुम्हालाही अशी लक्षणं दिसत असतील तर समजा की, तुम्हाला जास्त पाणी पिण्याची गरज आहे. *पाणी कमी झाल्याची लक्षणं* *लघवीचा रंग बदलणे* शरीराला जर पुरेसं पाणी मिळालं नाही तर लघवीचा रंग डार्क पिवळा होतो. पाणी कमी झाल्यावर डार्क पिवळ्या किंवा नारंगी रंगाची लघवी येते. त्यामुळे असं होत असेल तर पाणी भरपूर प्या. *बद्धकोष्ठता* पाणी पचनक्रियेसाठी खूप महत्वाचं असतं. जर शरीरात पाणी कमी झालं किंवा तुम्ही पाणी कमी पित असाल तर पचनासंबंधी समस्या होतात. पाणी झाल्यावर बद्धकोष्ठतेची समस्या होते. म्हणजे सकाळी पोट व्यवस्थित साफ होत नाही. *डोकेदुखी आणि थकवा* शरीरात पाणी कमी झाल्यावर डोकं दुखू लागतं. तसेच यामुळे शरीरात थकवा सुद्धा जाणवतो. जर दिवसभर पुरेसं पाणी प्याल तर असं होत नाही. डिहायड्रेशनची समस्या दूर करण्यासाठी पाण्यासोबतच नारळाचं पाणी, लिंबू पाणी पिऊ शकता. *तोंडाची दुर्गंधी* दिवसभर थोडं थोडं पाणी पित रहाल तर तोंडाची दुर्गंधी दूर होते आणि तोंडात लाळ तयार होत राहते. पण जर भरपूर पाणी पित नसाल तर तोंडात दुर्गंधीसाठी कारणीभूत बॅक्टेरिया वाढतात. त्यामुळेच तोंडाची दुर्गंधी येऊ लागते. *मसल्समध्ये वेदना* दिवसभर जर भरपूर पाणी प्याल तर रक्तप्रवाह सुरळीत राहतो. याउलट जर भरपूर पाणी पित नसाल तर ब्लड फ्लोमध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे मसल्समध्ये वेदना होतात. शरीर आखडल्यासारखं वाटतं. *तोंड आणि घसा कोरडा पडणं* सामान्यपणे शरीरात पाणी कमी झाल्यावर तोंड आणि घसा कोरडा पडतो. तुम्हाला जर असंच काही जाणवत असेल तर आणि पुन्हा पुन्हा तहान लागत असेल तर शरीरात पाणी कमी झालं आहे. *त्वचा कोरडी पडणे* शरीरात जेव्हा पाणी कमी होतं तेव्हा त्याचा प्रभाव बाहेर त्वचेवर दिसू लागतो. जे लोक पुरेसं पाणी पित नाहीत, त्यांची त्वचा कोरडी दिसू लागते. त्वचेचा हा कोरडेपणा दूर करण्यासाठी पुरेसं पाणी प्यावं. *शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी व्हाट्सअप चैनल ला फॉलो करा* https://whatsapp.com/channel/0029Va9EXB0KbYMM1tGbBz0W
❤️ 1

Comments