
डिजिटल शेतकरी
May 31, 2025 at 04:15 AM
*अचानक पडणाऱ्या विजांपासून कसे कराल जनावरांचे संरक्षण; जाणून घ्या सविस्तर*
*🌾डिजिटल शेतकरी🌾*
वीज चमकणे, वीज पडणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. पृथ्वीवरील सर्वात जुनी अशी नैसर्गिक प्रक्रिया आहे. वीज पडून अनेक वेळा जनावरांचा मृत्यू झाल्याचे आपण माध्यमातून वाचत असतो. अलीकडे महाराष्ट्रात देखील अशा अनेक घटना घडल्या आहेत.मे २०२१ मध्ये आसाम मध्ये वीज पडून १८ हत्तीचा कळप मृत्युमुखी पडून मोठी हृदय द्रावक घटना घडली होती. भारतीय हवामान विभागाच्या सन २०-२१ च्या अहवालानुसार हवामान बदलाचे हे सर्व परिणाम आहेत.
वाढत्या तापमानामुळे विज पडण्याच्या घटनांमध्ये ३४% वाढ झाली आहे. विज पडण्याबाबत अचूक वेळ आणि ठिकाण याबाबत निश्चित अंदाज वर्तवणे खूप अवघड असते. तसेच पशुपालक याबाबतीत अनभिज्ञ असल्यामुळे त्यांना अनेक वेळा खूप मोठे नुकसान सोसावे लागते.
*वीज जनावरावर पडल्यानंतर नक्की काय होते?*
◼️ वीज जनावरावर पडल्यानंतर हृदयाच्या स्नायूचे असंतुलित हालचाल वाढून श्वसन क्रिया बंद पडते.
◼️ शरीरात अंतर्गत रक्तस्त्राव होतो.
◼️ मज्जा संस्थेचे नुकसान होते.
◼️ हाड तुटणे, ऐकू न येणे किंवा दृष्टी गमावणे या सह मृत्यू देखील होऊ शकतो.
◼️ वीज पडण्यावर आपले नियंत्रण नसले तरी आपण काळजी मात्र निश्चित घेऊ शकतो.
*विजांपासून कसे कराल जनावरांचे संरक्षण*
◼️ गोठ्यात तांब्याचा तारेचा वापर करून चांगल्या पद्धतीने अर्थिंग करून घेतल्यास धोका व नुकसान कमी करता येते.
◼️ वादळ वारा पाऊस सुरू झाला की जनावरे सहसा झाडाखाली आश्रय घेतात.
◼️ अशावेळी मोकळ्या जागेत चरण्यास सोडलेल्या जनावरांना झाडाखाली न थांबवता गोठ्यात घेऊन जावे.
◼️ मोठी झाडे असलेल्या जंगलाच्या कड्यावर, मोकळ्या माळरानावर जनावरे चरायला सोडू नये.
◼️ डोंगर माथ्यावर वीज पडू शकते पण दरीमध्ये सहसा पडत नाही. त्यासाठी अशा ठिकाणी जनावरे घेऊन जाणे धोकादायक आहे.
◼️ गोठ्याच्या आसपास उंच झाडे, विद्युत खांब असू नयेत.
◼️ साधारण उंच इमारती, उंच खांब यावर वीज कोसळू शकते.
◼️ विज पडताना अनेक वेळा जनावराच्या अंगावरील केस उभे राहतात. अंगावर काटा येतो. आपण जवळपास असलो तरी अशाच प्रकारची जाणीव आपल्यालाही होते.
◼️ त्यावेळी विज पडण्याची शक्यता विचारात घेऊन तात्काळ जनावर गोठ्यात किंवा बंदिस्त इमारतीमध्ये हलवावीत. सुरक्षित ठिकाणी आश्रय घेणे फार महत्त्वाचे आहे.
◼️ कोणत्याही परिस्थितीत झाडाखाली जनावरे उभी राहणार नाहीत याची काळजी घ्यावी.
◼️ जवळपास इमारत नसेल तर दरीत गुहेत देखील जनावरे आपण हलवू शकतो.
◼️ गोठा बांधताना विशेषतः छत आणि भिंती पूर्णपणे धातूच्या असू नयेत.
◼️ उन्हाळ्यात जनावरे पाण्यात डुंबत असतात. अशा वेळी अनेक वेळा अवकाळी पाऊस पडतो. गडगडाटासह विजा चमकतात. अशावेळेस जनावरे तात्काळ पाण्यातून बाहेर हलवावीत. व गोठ्यात घेऊन जावे.
◼️ गोठ्यातील विद्युत उपकरणे चालू करू नयेत.
◼️ लोखंडी अवजारे ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी.
या आणि अशा गोष्टीमुळे आपण होणाऱ्या नुकसानाची तीव्रता निश्चितपणे कमी करू शकतो.
डॉ. व्यंकटराव घोरपडे
सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली
*शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी व्हाट्सअप चैनल ला फॉलो करा*
https://whatsapp.com/channel/0029Va9EXB0KbYMM1tGbBz0W
👍
❤️
4