डिजिटल शेतकरी
डिजिटल शेतकरी
June 10, 2025 at 09:17 AM
*लासलगाव, पिंपळगावसह सोलापूर बाजारात कांद्याला चमक आली, वाचा आजचे दर* *🌾डिजिटल शेतकरी🌾* कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बाजारभावातून (Kanda Market) दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून कांदा बाजार भावसमाधानकारक असल्याचे चित्र आहे. महत्त्वाचं म्हणजे नाशिक जिल्ह्यातील (Nashik Kanda Market) बहुतांश बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात सुधारणा होत आहे. उन्हाळ कांद्याला सरासरी 1300 ते 1400 रुपयांपर्यंत दर मिळतो आहे. रोजी राज्यातील बाजारात काय भाव मिळाला हे पाहुयात. आज नाशिक जिल्ह्यात (Unhal Kanda Market) उन्हाळ कांद्याची 94 हजार क्विंटलची आवक झाली. यात लासलगाव (Lasalgoan Kanda Bajarbhav) बाजारात कमीत कमी सहाशे रुपये तर सरासरी 1600 रुपयांचा दर मिळाला. अनुक्रमे येवला बाजारात सरासरी 1350 रुपये, नाशिक बाजारात 900 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 1650 रुपये, सिन्नर बाजारात 1400 रुपये तर देवळा बाजारात 1575 रुपये दर मिळाला. तर दुसरीकडे लाल कांद्याला सोलापूर बाजारात सरासरी 1100 रुपये, धुळे बाजारात 800 रुपये नागपूर बाजारात 1600 रुपये, भुसावळ बाजारात 1200 रुपये असा दर मिळतो आहे. तर पुणे बाजारात देखील लोकल कांदा दरात वाढ झाली असून आज 1300 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. *शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी व्हाट्सअप चैनल ला फॉलो करा* https://whatsapp.com/channel/0029Va9EXB0KbYMM1tGbBz0W
👍 😢 2

Comments