Muslim Welfare Association
Muslim Welfare Association
May 25, 2025 at 06:50 AM
https://www.facebook.com/share/p/16Wy4qdjKV/?mibextid=wwXIfr हजरत गैबान शाह वली र.अ. (अंबरनाथ) यांच्या उर्स निमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहिलो. या कार्यक्रमात हजरत गैबान शाह पॉलिक्लिनिक मार्फत सर्वसामान्य गरजू नागरिकांना दर्जेदार व सुलभ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. अवघ्या ५० रुपयांमध्ये एम.डी., एम.एस., ऑर्थोपेडिक तसेच इतर विशेषज्ञ डॉक्टरांच्या सेवा, दोन दिवस मोफत औषध वितरण, मोफत नेत्रतपासणी आणि कमी दरात चष्म्यांची उपलब्धता यांसारख्या उपक्रमांचा लाभ दररोज १०० पेक्षा अधिक सर्व जाती-धर्मांतील रुग्ण घेत आहेत. लवकरच मोफत डायलिसिस सेंटर सुरू होणार असून त्यासाठी आवश्यक जागा उभारण्यात आली आहे. कार्यक्रमास अंबरनाथ मस्जिद ट्रस्ट (मुस्लिम जमात अंबरनाथ) चे अध्यक्ष हाजी सलीम जिंदावली चौधरी, कार्याध्यक्ष आरिफ असगर अली काझी, सेक्रेटरी इम्रान मुश्ताक शेख,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते महेश तापसे मुस्लिम वेल्फेअर असोसिएशन चे पश्चिम महाराष्ट्र संघटक सचिव समीर पटेल, ट्रस्टी व उर्स कमिटीचे उपाध्यक्ष माजी नगरसेवक बिस्मिल्लाह उमर शेख, ट्रस्ट कॅशिअर साबीर जे. चौधरी, ट्रस्टी व उर्स कमिटीचे चेअरमन जलाल के. शेख, तसेच ट्रस्टी नईम शेख तसेच मकबूल खान, हैदर अली शेख, सैफ शेख आणि मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचे अमरनाथ तालुका अध्यक्ष ख्वाजा युनुस चौधरी,ठाणे यूथ ऑर्गनायझेशनचे सचिव आखिफ खांडे, कोकण विभागाचे सचिव मेहबूब शेख उपस्थित होते. समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी अशा सेवा आणि सामाजिक उपक्रमांचे मन:पूर्वक कौतुक करावेसे वाटते. #saleemsarang #sarangspeaks #forthepeople

Comments