Raksha Khadse Official

Raksha Khadse Official

683 subscribers

Verified Channel
Raksha Khadse Official
Raksha Khadse Official
May 20, 2025 at 04:21 PM
*मातृतीर्थ सिंदखेडराजा (बुलढाणा) येथे आयोजित राष्ट्रीय महासत्संग सोहळा कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित...* *परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज* यांच्या कृपेने आणि *परमपूज्य गुरुमाउली अण्णासाहेब मोरे* यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली, *अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग* मार्फत राजमाता जिजाऊ यांचे पावन जन्मस्थळ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ *मातृतीर्थ सिंदखेडराजा जि. बुलढाणा* येथे *राष्ट्रीय महासत्संग सोह सोहळा* कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा महिला सक्षीमीकरणासाठी व विश्वशांतीच्या पवित्र हेतूसाठी समर्पित असून, *परमपूज्य गुरुमाउली अण्णासाहेब मोरे* यांच्या यांच्याद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार असता, *केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे* ह्या *केंद्रीय राज्यमंत्री श्री.प्रतापराव जाधव* यांच्यासह उपस्थित होत्या.
🙏 2

Comments