
Raksha Khadse Official
June 4, 2025 at 10:04 AM
*रेल्वे बोर्ड चेअरमन श्री.सतीश कुमार यांची केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे यांनी घेतली भेट - रावेर लोकसभा अंतर्गत रेल्वे स्थानकांवर थांबे वाढवण्यावर झाली चर्चा*
*रेल भवन (नवी दिल्ली)* येथे *केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी *रेल्वे बोर्डाचे चेअरमन श्री.सतीश कुमार* यांची भेट घेऊन भुसावळ रेल्वे विभागातील रावेर स्थानकावर काही महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे मिळावेत अशी मागणी केली. या बैठकीत भुसावळ रेल्वे विभागातील स्थानिक नागरिकांच्या वाढत्या मागणीनुसार काही महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे *रावेर, वरणगाव, बोदवड, निंभोरा, मलकापूर व नांदुरा* इ. स्थानकांवर देण्याबाबत सुद्धा चर्चा झाली. याचबरोबर, प्रवाशांच्या सोयीसाठी काही महत्त्वाच्या खालील नमूद रेल्वेगाड्यांचे थांबे तात्काळ मंजूर करावेत, अशी विनंती सुद्धा करण्यात आली.
* दानापुर पुणे एक्सप्रेस गाडी क्र.12150 – रावेर थांबा (पुणे मार्ग)
* नवजीवन एक्स्प्रेस गाडी क्र. 12656/12655 – बोदवड थांबा
* महानगरी एक्सप्रेस गाडी क्र. 22177/22178 – रावेर थांबा
* अमृतसर मुंबई एक्सप्रेस गाडी क्र. 11057/ 11058 – निंभोरा थांबा
* गरीब रथ एक्सप्रेस गाडी क्र. 12113/12114 – मलकापूर थांबा
* गाडी क्र. 12719/12720 आणि 22137/22138 – नांदुरा थांबा
* आझाद हिंद एक्सप्रेस गाडी क्र. 12129/12130 – बोदवड थांबा
* सूरत अमरावती एक्सप्रेस गाडी क्र. 20925/20926 – बोदवड थांबा
रावेर या ठिकाणी गाड्यांचे थांबे देण्यात आल्यास शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, नोकरदार, कामगार वर्ग आणि सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. तसेच यामुळे संपूर्ण परिसराचा सामाजिक व आर्थिक विकास साधला जाईल. रेल्वे मंत्रालयाकडून यावर सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे.
*रेल्वे बोर्डाचे चेअरमन* यांनी सदर मागण्यांकडे सकारात्मकपणे लक्ष देण्याचे आश्वासन दिले असून, लवकरच या मागण्यांवर निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.
❤️
🙏
2