
Dr. Pareexit Shevde
May 28, 2025 at 08:12 AM
#महत्वाचे
गेल्या पाच वर्षांत आपण विसरले असू म्हणून पुन्हा एकदा छोटीशी आठवण; सध्या.....
१. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा / मास्कचा वापर करा. को*ड / सुईमुळे फुफ्फुसांना झालेली इजा, COPD, Fibrosis, दमा किंवा रोगप्रतिकार क्षमता कमी असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घ्या.
२. सर्दी, खोकला, ताप ही लक्षणं अंगावर न काढता; को*ड (श्वसनक सन्निपात - हा शब्द लक्षात ठेवा) मध्ये उपचार देण्याचा अनुभव असलेल्या आपल्या जवळील वैद्यांचा तत्काळ सल्ला घ्या.
३. वैद्यांकडे जाताना आपल्याला लक्षणे असल्यास; स्वतः न जाता शक्यतो आपल्या थेट संपर्कात न आलेल्या व्यक्तींना किंवा अन्य कुटुंबियांना पाठवा.
४. एरव्हीही सध्या लॅब, डॉक्टर अशा ठिकाणी जाताना मास्कचा उपयोग करा.
५. नियमित व्यायाम, प्राणायाम करा आणि आहारात दूध, दही, ताक, फळे हे पदार्थ कमीत कमी ठेवा.
गेल्या महिन्यापासूनच रुग्ण सुरू झाले आहेत. ज्या रुग्णालयांनी सहमती / ना हरकत दिली तिथे मागच्या वेळसारखे ICU मध्येही काम सुरू झाले आहे. सध्या तरी वर दिलेली काळजी पुरेशी आहे. अधिक काही वाटलंच वेळोवेळी कळवू.
तोवर; काळजी करू नका. काळजी घ्या!
- वैद्य परीक्षित शेवडे; आयुर्वेद वाचस्पति
👍
🙏
❤️
71