
Dr. Pareexit Shevde
May 29, 2025 at 03:24 AM
#महत्त्वाचे
अमेरिकेतील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पीटर मॅकलॉ यांनी सिनेटसमोर केलेल्या गौप्यस्फोटात जगातील सगळ्यात मोठ्या शवविच्छेदन निरीक्षण अहवालानुसार को*ड सुई टोचल्यावर झालेल्या मृत्यूंपैकी ७४% मृत्यूंचे कारण सुई होती असं सांगितलं. याबाबतची संशोधनं पारदर्शकपणे होत नाहीत; कारण अनेकांचे आर्थिक हितसंबंध त्यात असतात असंही त्यांनी सांगितलं! इतकंच नाही; या सुयांवर "मृत्यू" हा धोका ठळकपणे नमूद करण्यात यावा असंही मत या प्रसंगी अन्य तज्ज्ञांनी मांडलं.
HHS अध्यक्ष RKF Jr. यांनी इथून पुढे सुयांची जबरदस्ती कोणावर होऊ नये याकरता धोरण स्पष्ट ठेवलं जाईल म्हणून सांगितलं आणि काही मोठ्या कंपन्यांच्या फ्लू किंवा तत्सम सुयांच्या करारावर कुऱ्हाड मारली. आपल्याकडे तर वेगळ्या प्रकारच्या सुया होत्या. आपला याच्याशी काही संबंध नाही....भूतकाळ पाहता; असा बालिश युक्तिवाद काहीजण करू शकतील.
जगभरातील १ कोटी व्हायरल वेक्टर सुई (आपल्याकडे सर्वात जास्त दिली तीच ती!) वरील निरीक्षणं असं सांगतात की; टोचणीनंतर हृदयाचा दाह, रक्तात गाठी आणि GBS होण्याची शक्यता सुई घेतल्यावर अडीच ते तीन पटीने वाढते. आपल्या देशात किती मोठ्या लोकसंख्येने सुई घेतली आहे हे पाहता १ कोटी हा फार लहान सँपल साईज आहे. देशात हे साईड इफेक्ट्स नोंदवण्याची सक्षम प्रणाली असती तर आणखी वेगवेगळे आकडे समोर आले असते. आकडे जमा न करताच जगभरातल्या संशोधनाकडे दुर्लक्ष करणं ही अफाट वैज्ञानिकता आहे! या सुईला युरोपमधून बहुतांशी हद्दपार करण्यात आलं होतं हे लक्षात घ्या.
सुई घेतली असेल तर HS CRP ही चाचणी करून घ्या; अशी पोस्ट मी पहिल्यांदा सुया आल्या तेव्हाच लिहिली होती. या चाचणीचे उपचार पूर्वी वाढलेले आणि नंतर कमी झालेले असे अनेक रिपोर्ट्स इथे शेअर केले होते. अनेक सेमिनार मधून आयुर्वेदाच्या विद्यार्थी/ वैद्यांसमोरही हा विषय पुराव्यांसह मांडला होता. आमच्या पाश्चात्य वैद्यकातील काही मित्रांनी या चाचणीची काही आवश्यकता नसल्याचं मत व्यक्त केलं होतं. आज कोणत्याही आघाडीच्या ब्लड टेस्ट पॅकेजमध्ये या चाचणीचा समावेश असतो; जो यापूर्वी नव्हता!
आम्ही reel वाले लोक नाही; real वाले लोक आहोत. आम्ही क्लिनिकल काम करत असतो. कोणत्याही लाभाची अपेक्षा नसताना वेळेत आपल्याला सजग करत असतो. लक्ष द्यायचं की नाही हा तुमचा निर्णय!
"आता घेऊन तर झाली. आता काय करू?"......इथून पुढे तरी विचार करत जा आणि इथून पुढे कोणताही Autoimmune त्रास सुरू झाला तर या सगळ्या अवस्थांत काम करण्याचा अनुभव असलेला कोणीही वैद्य गाठा! "आयुर्वेद ही जीवनशैली आहे" वगैरे सगळं योग्य. पण "उपचार" म्हणून आयुर्वेदाकडे जितक्या लवकर याल तितका लाभ आहे हे विसरू नका!
- वैद्य परीक्षित शेवडे; आयुर्वेद वाचस्पति
👍
🙏
❤️
👌
✅
😮
❤
💯
🤔
92